Online Friendship : प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री या नात्याला विशेष स्थान आहे. मैत्री या नात्यात जिव्हाळा, प्रेम, काळजी व आपुलकीची भावना असते. कधी हीच मैत्री संकटात साथ देते; तर कधी हीच मैत्री अडचणींचा सामना करण्यासाठी खंबीरपणे आपल्याबरोबर उभी असते. खरे तर चांगला मित्र मिळणे यासाठी चांगले नशीब असावे लागते.

सध्याच्या या आधुनिक जगात सर्व काही ऑनलाइन झाले आहे. अनेक जण सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे या सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांना अनेक नवनवीन मित्रसुद्धा भेटतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसारख्या सोशल साइटवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. आज आपण त्याचविषयी सविस्तर जाणून घेऊ.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
  • ऑनलाइन मैत्री करताना या गोष्टीचे भान ठेवा की, नेहमी आपल्या मित्रांना सोडून ऑनलाइन मित्रांबरोबर चॅटिंग करणे किंवा त्यांची वाट पाहत सतत स्वत: ऑनलाइन राहणे हे खूप चुकीचे आहे. अशा वेळी तुम्ही फक्त तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवत असता.
  • ऑनलाइन मैत्री सावधगिरीने करा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करू नका. अनेकदा यातूनच ऑनलाइन स्कॅम घडून येतात.

हेही वाचा : How to Stop Snoring : तुमच्या जोडीदाराला घोरण्याची सवय आहे का? या ट्रिक्सच्या मदतीने करा त्यांची सुटका!

  • फेसबुक, इन्स्टाग्रामवर एखाद्याला चांगले ओळखत नसाल, तर त्यांच्याशी व्हिडीओ कॉल किंवा कॉलवर बोलणे टाळा किंवा चुकूनही तुमचे फोटो त्यांच्याबरोबर शेअर करू नका. अनेकदा समोरची व्यक्ती फसवणूक करणारी किंवा हॅकर असू शकते; जी तुमचा जास्तीत जास्त डेटा गोळा करून, त्याचा चुकीचा वापर करू शकते.
  • ऑनलाइन मैत्री करताना नेहमी सावध राहा. एखादा ऑनलाइन मित्र अडचणीत असल्याचे भासवत तुमच्याकडून पैसे लुबाडू शकतो. त्यामुळे ऑनलाइन मैत्री करताना आर्थिक व्यव्हार करणे शक्यतो टाळावे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)