Surya Namaskar Video : दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे, योगा करणे आणि पोषक आहार घेणे गरजेचे आहे. अनेक लोकांना योगा करायाल आवडते पण नीट योगा कसा करावा, यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आज आपण सूर्यनमस्कार कसा करावा, या विषयी जाणून घेणार आहोत.
सूर्यनमस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा एक महत्त्वाचा योगा असून याचे शरीराला अनेक फायदे होतात.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सूर्यनमस्कार कसा करावा, या संदर्भात सविस्तर सांगितले आहे.

योग अभ्यासक मृणालिनी यांनी या व्हिडीओमध्ये मंत्रोच्चार व श्वासांबरोबर सूर्यनमस्कार कसा करायचा, या विषयी सांगितले आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे त्या सुरुवातीला दोन्ही हात वर करुन नमस्कार करताना दिसतात त्यावेळी त्या श्वास घेतात. ॐ नम: शिवाय म्हणत प्रणामासन करतात. त्यानंतर पुढे व्हिडीओत त्या श्वास घेत हात वर करुन पाठीमागे वाकतात आणि ॐ रवये नम: म्हणत हस्तउत्तासन करतात. त्यानंतर त्या हात पुढे घेऊन खाली वाकतात आणि हाताचा स्पर्श जमीनीला करतात. ॐ सूर्याय नम: म्हणत त्या पादहस्तासन करतात. त्यानंतर त्या एक पाय मागे नेतात आणि एक पाय गुडघ्यावर ठेवून वर मान करून बघतात आणि श्वास घेतात. त्यावेळी त्या ॐ भानवे नम: म्हणत अश्वसंचालनासन करतात. त्यानंतर त्या दोन्ही पाय मागे घेऊन जातात आणि हातावर आणि पायांच्या बोटावर शरीराचा तोल सांभाळत पुढे बघतात. यावेळी त्या श्वास सोडतात. ॐ खगाय नम: म्हणत दंडासन करतात .

पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्या छाती, हनुवटी आणि गुडघे जमीनीला टेकवतात आणि त्यानंतर त्या संपूर्ण पाय जमीनीला टेकवतात आणि वरील शरीर उचलतात.चेहरा वर करुन श्वास घेतात त्यावेळी त्या भूजंगासन स्थितीत दिसतात आणि ॐ हिरण्यगर्भाय नम:चा मंत्रोच्चार करतात. त्यानंतर त्या ॐ मरीचये नम: म्हणत श्वास सोडतात आणि पर्वतासन करतात. त्यानंतर त्या ॐ आदित्याय नम: म्हणत अश्वसंचालनासन करतात. यावेळी त्या श्वास घेतात नंतर त्या पादहस्तासन पुन्हा करतात आणि ॐ सावित्रे नम: म्हणत श्वास सोडतात. त्यानंतर त्या पुन्हा हस्तउत्तानासन करत श्वास घेतात आणि ॐ अर्काय नम: म्हणतात आणि शेवटी प्रणामासन करत ॐ भास्कराय नम:चा जाप करतात आणि श्वास सोडतात.

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेय, सूर्योदय आणि सूर्यास्तच्या वेळेस लयीत बारा क्रमात केलेली योगसाधना म्हणजे सूर्यनमस्कार.
सुर्यनमस्कार म्हणजे सूर्याची उपसनाच होय.
सुर्यनमस्काराची बारा आसने करताना व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सूर्याची बारा नावे (मंत्र) उच्चारण करून आपण सूर्य आणि संपूर्ण सृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करू या.
सुर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य सुदृढ होते.”

हेही वाचा : Personality Traits : तुमचे केस कसे आहेत? सरळ, कुरळे की पिळाकार; केसांवरुन ओळखा व्यक्तीचा स्वभाव

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “पहिल्यांदाच कोणीतरी एवढी व्यवस्थित माहिती सांगितली.” तर एका युजरने लिहिलेय, “फार फार छान आणि सहजतेने अभ्यासपूर्ण अचूक सूर्यनमस्कार मंत्रोच्चारसहीत श्वास आणि उच्छवास क्रिया फार उत्तम रितीने दाखवून दिली. छान मार्गदर्शन मिळाले.मनापासून खूप खूप धन्यवाद आपले.” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला आहे.

Story img Loader