१५ ऑक्टोबरला दसरा हा सण मोठ्या उत्साहात देशभर साजरा करण्यात येणार आहे. सध्या कोणताही सण आला की आपण आपल्या नातेवाईकांना सोशल मीडिया अॅप्स वरून शुभेच्छा पाठवत असतो. हे आता एक ट्रेंड बनला आहे आणि त्यात जास्त करून आपण व्हॉट्सअॅपवर शुभेच्छा पाठवत असतो. त्यात व्हॉट्सअॅप हा अॅप देशातील एक लोकप्रिय निवड राहिली आहे. कारण देशातील लाखो लोकं या अॅपचा वापर करतात. या करिता या दसरा सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सुद्धा व्हॉट्सअॅपवरुन मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना हॅपी दसरा २०२१ स्टिकर्स पाठवू शकतात. तसेच स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवरून मित्रांसोबत सण साजरा करण्यासाठी विविध लेन्स आणि फिल्टर वापरू शकतात. तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दसरा स्टिकर्स कसे डाउनलोड आणि सामायिक करू शकता, ते कसे चला पाहुयात.
व्हॉट्सअॅपवर स्टिकर्स कसे डाऊनलोड करून पाठवायचे
स्टेप १:- तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि सर्च बारवर दसरा स्टिकर्स व्हॉट्सअॅप टाईप करावे लागेल. हे टाईप केल्यावर तुम्हाला अनेक अॅप्स दिसतील. तुम्ही त्यापैकी एक निवडू शकता आणि इंस्टॉलवर क्लिक करू शकता. याव्यतिरिक्त आरपी डेव्हलपर लॅब्स कडून “दसरा स्टिकर्स” अॅप डाउनलोड करू शकता.
स्टेप २ :- एकदा तुम्ही ते अॅप तुमच्या फोनवर डाउनलोड केले की उघडा आणि स्टार्ट बटण दाबा.
स्टेप ३ :- तुम्हाला या अॅपमध्ये काही स्टिकर पॅक दिसतील. यात तुम्हाला दसरा आणि दिवाळी असे दोन सणाचे दोन्ही स्टिकर्स मिळतील. तुम्हाला यात कोणत्याही स्टिकर पॅकवर टॅप करण्याची आवश्यकता आहे.
स्टेप ४: -आता तुम्ही “अॅड टू व्हॉट्सअॅप” बटणावर टॅप करून मेसेजिंग अॅपमध्ये तुम्हाला आवडणारा स्टिकर पॅक जोडू शकता. त्यात तुम्हाला अॅप पुन्हा “ADD” बटणावर टॅप करण्यास सांगेल.
स्टेप ५:- आता तुम्ही व्हॉट्सअॅप उघडा आणि त्यात स्टिकर्स सेक्शनला जा, आणि तिथे तुम्हाला तुम्ही डाऊनलोड केलेले नवीन दसरा स्टिकर्स सापडतील. मेसेजिंग अॅपच्या स्टिकर्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कधीही कोणताही स्टिकर पॅक काढू शकता.
स्नॅपचॅट, इन्स्टाग्रामवर दसरा २०२१ शुभेच्छा कशा पाठवायच्या?
तुम्ही जर स्नॅपचॅट वापरत आहात तर तुमच्या या स्नॅपचॅट मध्ये दसरा लेन्स वापरू शकतात आणि त्यांना तुमच्या स्टोरीवर अपलोड करू शकतात. यात तुम्ही स्नॅपचॅट जाऊन फक्त इमोजी चिन्हावर टॅप करा आणि डावीकडे स्वाइप करणे आवश्यक आहे जोपर्यंत तुम्हाला “एक्सप्लोर” पर्याय सापडत नाही. त्यानंतर फक्त तुम्हाला सर्च चिन्हावर टॅप करावे लागेल आणि दसरा टाइप करा. यानंतर तुम्हाला स्नॅपचॅट बरेच फिल्टर आणि लेन्स स्क्रीनवर दिसेल. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी करू शकता.
मात्र यात तुम्हाला स्नॅपचॅटवर मिळणारे फिल्टर इन्स्टाग्रामवर उपलब्ध नाहीत. पण स्नॅपचॅट तुम्हाला तुमच्या स्टोरीस तुमच्या कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करू शकता. या स्टोरीस सेव्ह केल्यानंतर तुम्ही तुमचे फोटो किंवा क्लिप इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट शेअर करू शकतात.