How To Dry Clothes In Winter Tips In Marathi : नवीन वर्ष जसजसे जवळ येत आहे, तसतशी थंडी आणखीन वाढू लागली आहे. भारतातील बहुतांश राज्यांमध्ये डिसेंबर आणि जानेवारीमध्ये फारसा सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे हिवाळ्यात कपडे सुकवताना आपल्यातील अनेकांना खूप जास्त त्रास होतो. कारण कपडे जास्त वेळ ओले राहिले तर कपड्यांना कुबट वाससुद्धा येत असतो. जर तुम्हालाही या समस्येपासून सुटका हवी असेल असेल, तर तुम्ही पुढे दिलेल्या काही टिप्स फॉलो करून बघू शकता.
पुढील काही हॅकच्या मदतीने तुम्ही तुमचे ओले कपडे सूर्यप्रकाशाशिवाय अगदी आरामात सुकवू शकता… (How To Dry Clothes In Winter Tips In Marathi)
इस्त्री
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, हिवाळ्यात ओले कपडे सुकवण्यासाठी तुम्ही इस्त्रीचा वापर करू शकता. सर्व प्रथम बेडवर एक सुती कापड पसरवा. आता त्यावर ओले कपडे ठेवा. यानंतर या कपड्यांवर दुसरे कापड ठेवा आणि नंतर इस्त्री फिरवा. या हॅकच्या मदतीने ओले कपडे सूर्यप्रकाशाशिवायही बऱ्याच प्रमाणात सुकवता येतात.
रूम हीटर
ओले कपडे सुकवण्यासाठी तुम्ही रूम हीटरचाही वापर करू शकता. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हा हॅक खूप फायद्याचा आहे. यासाठी प्रथम सर्व ओले कपडे एका चादरीवर पसरवा. आता या कपड्यांवर दुसरी चादर टाका. आता रुम हीटर बेडच्या उंचीवर असलेल्या स्टूल किंवा टेबलवर ठेवा आणि तो चालू करा. काही तासांतच तुम्हाला कपडे बऱ्याच प्रमाणात सुकलेले दिसतील.
हेअर ड्रायर
हिवाळ्यात ओले कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायरदेखील वापरू शकता. केस सुकविण्यासाठी वापरण्यात येणारे हेअर ड्रायरदेखील कपडे सहज सुकवू शकतात. या तीन पद्धतींच्या मदतीने तुम्ही हिवाळ्यात सूर्यप्रकाश नसतानाही ओले कपडे सुकवू शकता (How To Dry Clothes In Winter Tips In Marathi) .