तुमच्याकडेही फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अनेकदा घाईगडीबडीत आपल्याकडे फाटलेल्या नोटा येतात. मात्र त्या पुन्हा दुकानदाराला द्यायला गेलो की तो परत नाही. अनेकदा यावरून भांडणंही होता. दुसरीकडे खिशात एखादी नोट विसरून जातो आणि कपडे धुताना ओल्या होतात आणि फाटतात. त्यामुळे आता या नोटा कश्या बदलायचा असा प्रश्न पडतो. या नोटा तुम्ही सहज बदलू शकता. आरबीआयने फाटलेल्या नोटांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्याअंतर्गत तुम्ही तुमच्या फाटलेल्या नोटा बदलू शकता. तुम्ही या नोटा कशा बदलू शकता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या २०१७ च्या चलनी नोटा बदलण्याच्या नियमांनुसार, जर तुम्हाला एटीएममधून फाटलेल्या नोटा मिळाल्या, तर तुम्ही त्या बँकेत बदलू शकता. कोणतीही सरकारी बँक ती बदलण्यास नकार देऊ शकत नाही. ५, १०, २० आणि ५० रुपयांच्या छोट्या नोटा, ज्यातील किमान ५० टक्के भाग सुरक्षित असेल, तर तुम्ही तुमची नोट सहज बदलू शकता. जर फाटलेल्या नोटांची संख्या २० पेक्षा जास्त असेल आणि नोटांचे मूल्य ५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेला काही फी भरावी लागेल. नोटेचा काही भाग पूर्णपणे फाटला असेल, नोटेचे दोन तुकडे झाले असतील किंवा अर्धी नोट जळली असेल, तर तुम्ही अशा नोटा फक्त आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये बदलू शकता. येथे तुम्हाला एक फॉर्म सबमिट करावा लागेल. या व्यतिरिक्त जर कोणत्याही बँकेने तुमच्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिला, तर तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category या लिंकवर जाऊन तक्रार करू शकता.
आता Aarogya Setu अॅपवरून आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करा, फायदे जाणून घ्या
फाटलेल्या नोटांबाबत आरबीआयने जारी केलेल्या तरतुदींनुसार, जर या नोटा ४० टक्क्यांपेक्षा जास्त विभागल्या गेल्या असतील, तर त्या परिस्थितीत पूर्ण परतावा दिला जाईल. आरबीआयने २ हजार रुपयांच्या खराब झालेल्या नोटांसाठीचे नियमही बदलले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जर खराब झालेल्या २ हजार रुपयांच्या नोटेचा मोठा तुकडा ८८ चौरस सेमी किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक संबंधित व्यक्तीला पूर्ण परतावा देईल. परंतु जर नोटेच्या तुकड्याचा मोठा भाग ४४ चौरस सेमी किंवा त्यापेक्षा कमी असेल तर अशा स्थितीत रिझर्व्ह बँक ग्राहकाला २००० ऐवजी फक्त १,००० रुपये परत करेल.
जर कोणत्याही बँकेने आरबीआयच्या नियमांना विरोध केला तर त्याच्यावरही कारवाई केली जाऊ शकते. याशिवाय, ग्राहकांच्या तक्रारीनुसार, बँकेला १० हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देखील द्यावी लागू शकते.