How To Spot Microplastics In Your Food : सध्या प्लास्टिक प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण, आता प्लास्टिकचा पर्यावरणासह मानवी मेंदूवरही वाईट परिणाम होत आहे. कारण हे मायक्रोप्लास्टिक ( Microplastics) पृथ्वीवरील हवा, पाणी, जल आणि खाद्यपदार्थ प्रदूषित करत आहे. अगदी पाच मिलिमीटरपेक्षा कमी आकाराचे मायक्रोप्लास्टिक किंवा लहान प्लास्टिकचे कण आता मीठ व साखरेच्या ब्रँडसह विविध खाद्यपदार्थांमध्ये आढळू लागले आहेत, असे अलीकडील अभ्यासात सांगण्यात आले आहे; त्यामुळे ही बाब आता चिंतेचा विषय ठरते आहे. मायक्रोप्लास्टिक किंवा लहान प्लास्टिकचे कण उघड्या डोळ्यांनी शोधता येण्यासारखे नाहीत. पण, तुमच्या अन्नामध्ये लहान प्लास्टिकचे कण आहेत का ते तपासून पाहण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करून पाहू शकता…

याबद्दल चर्चा करण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने दिल्ली येथील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या लीड कन्सल्टंट डॉक्टर नरेंद्र सिंगला यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, यासाठी व्यावसायिक चाचणी, आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे आवश्यक असू शकते. पण, तुम्हाला तुमच्या अन्नातील मायक्रोप्लास्टिक्स ( Microplastics) घरच्या घरी शोधयचं असेल तर डॉक्टर नरेंद्र सिंगला यांनी सुचवलेल्या काही गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत…

500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Milk or Curd face pack Ideas
Face Pack: दही की दूध? चेहऱ्याला लावताना बेसनाच्या पिठात नक्की काय मिसळावे? मग वाचा, ‘या’ टिप्स
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?
How long to boil eggs
कच्ची अंडी किती वेळ उकळायला हवी? अंडी उकडण्याची ३- ३- ३ पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का?
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

१. होममेड डेन्सिटी टेस्ट :

अन्नामध्ये मायक्रोप्लास्टिक (Microplastics) आहे का शोधण्याची एक सोपी पद्धत म्हणजे ‘होममेड डेन्सिटी टेस्ट.’ही चाचणी करण्यासाठी तुम्हाला एका ग्लासमध्ये एक चतुर्थांश भाजीपाला तेल, कॉर्न सिरप किंवा मध यांसारखे द्रव पदार्थ घ्यावे लागतील.
त्यामध्ये पदार्थांचे सँपल म्हणजेच मीठ, साखर किंवा अगदी पाणी किंवा रससुद्धा तुम्ही घालू शकता.
मिश्रण नीट ढवळून घ्या आणि नीट निरीक्षण करा.

हेही वाचा…yawn: समोरच्याने जांभई दिल्यावर तुम्हालासुद्धा जांभई येते का? ‘हे’ संसर्गजन्य आहे की वैज्ञानिक कारण? जाणून घ्या

मायक्रोप्लास्टिक्स वर तरंगतात, त्यांचा थर किंवा गुठळ्या तयार होतात. पण, जर तुम्ही केलेल्या चाचणीत सगळे पदार्थ समान रीतीने मिसळले तर ते पदार्थ मायक्रोप्लास्टिक मुक्त आहेत असे समजावे. पण, डॉक्टर नरेंद्र सिंगला पुढे म्हणाले की, ही पद्धत निर्दोष नाही आणि काही मायक्रोप्लास्टिक्स चुकून राहू शकतात किंवा अन्नामध्ये असलेल्या इतर कणांवर त्याचा परिणामही होऊ शकतो.

२. कॉफी फिल्टर वापरणे :

मायक्रोप्लास्टिक्स तपासण्याची दुसरी पद्धत, द्रवपदार्थांमध्ये कॉफी फिल्टर किंवा ०.१ मायक्रॉन फिल्टर वापरणे.
फिल्टरद्वारे द्रव घाला आणि निरीक्षण करा.
जर त्यात मायक्रोप्लास्टिक्सचे लहान कण असतील तर तुम्हाला लगेच दिसून येतील. कारण ते अजिबात विरघळत नाहीत.
ही पद्धत पाणी किंवा इतर पेये तपासण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

३. शेक टेस्ट :

मीठ किंवा साखरेसाठी तुम्ही शेक टेस्ट चाचणी करून पाहू शकता. मीठ किंवा साखरेचा कंटेनर हलवा आणि काही गडद पृष्ठभागावर ते पसरवून ठेवा.
कोणतेही असामान्य कण बाहेर पडले आहेत का हे बारकाईने पाहा. जर तुम्हाला निरीक्षणादरम्यान लहान कण दिसले तर ते मायक्रोप्लास्टिक्स आहे हे समजून घ्यावे.

या तीन पद्धतींव्यतिरिक्त तुम्ही कच्चे मांस, पोल्ट्री किंवा सीफूडसाठी वापरलेली तुमची स्वयंपाकघरातील भांडी नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केली पाहिजेत. या पद्धतींमुळे स्वयंपाकघरातील भांडी किंवा अन्न तयार करण्याच्या पृष्ठभागावर मायक्रोप्लास्टिक्स दिसणे कमी होण्यास मदत होईल. या घरगुती पद्धती मायक्रोप्लास्टिक्सच्या (Microplastics) उपस्थितीचे काही संकेत देऊ शकतात, परंतु ते पूर्णपणे विश्वासार्ह नाहीत, असा इशारा डॉक्टर नरेंद्र सिंगला यांनी दिला आहे. याव्यतिरिक्त अचूक तपासणीसाठी, अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्यांची चाचणी करू शकता, जेणेकरून तुमच्या अन्नातील मायक्रोप्लास्टिक्सचे कण आणि त्यांचा तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम तुम्हाला स्पष्टपणे समजेल.

Story img Loader