How To Find Sweet Orange: अलीकडे ट्रेनमध्ये दरदिवशी संत्री, चिकू घेऊन विक्रेते चढतात. आपणही हौशीने त्यांच्याकडून मसाला घालून संत्री विकत घेतो, सांगताना हे विक्रेते ताई, फळ एकदम गोड आहे म्हणूनच विकतात पण तुम्ही पहिली संत्र्याची फोड तोंडात ठेवताच आंबट चवीने मेंदू अगदी सुन्न होतो. मग पुन्हा त्या विक्रेत्याला जाब विचारावा तर बाबा तोपर्यंत बराच पुढे निघून गेलेला असतो. असा प्रसंग तुमच्यासह सुद्धा घडला आहे का? एक वेळ आंबट संत्री सुद्धा आपण खाऊ शकतो पण काहीवेळा तर संत्री/मोसंबी चवीला कडू असतात. हा धोका तुमच्याबरोबर होऊ नये यासाठी आपण आज सोप्या टिप्स पाहणार आहोत. तुम्हाला फक्त बघूनच संत्र गोड आहे की नाही हे कसे ओळखायचे हे आज आम्ही सांगणार आहोत.
गोड संत्री कशी ओळखाल? (How To Find Sweet Orange)
१) फळ हातात घेऊन हलकेच दाबून पहा जर ते लगेच दाबले जात नसेल तर फळ गोड आहे असे समजले जाते.
२) संत्र्यावर काही वेळा तपकिरी रंगाचे ओरखडे आपल्याला दिसतात याचा गोडव्याशी किंवा गुणवत्तेशी संबंध नाही. यांना वाऱ्याचे डाग म्हणून ओळखले जाते. काहीवेळ फळ वाऱ्याने झाडाच्या फांद्यांना आदळून असे डाग पडतात.
३) संत्र्याचे वजन तपासून पाहा. यासाठी फक्त हातात फळ घेतल्यावर तुम्हाला एखाद्या टेनिस बॉल एवढे वजन जाणवले तर हे फळ गोड आहे समजा. अधिक वजन म्हणजे अधिक रस असे गणित असते. तुम्ही गंधावरूनही परीक्षा करू शकता.
४) संत्र्याचा रंग हा एकदम चमकदार व केशरीच उत्तम पण काहीवेळा संत्री अधिक पिकल्यावर त्यांचा रंग हिरवट होत जातो. या दोन्ही पैकी एक रंग निवडा शक्यतो अर्धवट हिरवा व केशरी रंग हा आंबट संत्र्याचा असतो.
५) संत्र्याच्या पोटाचे बटण सुद्धा गोडवा दर्शवत असल्याचे काही जण सांगतात. खोलगट तळ असणारे संत्रे उत्तम मानले जाते.
हे ही वाचा<< एका नजरेत गोड कलिंगड कसे ओळखाल? न कापता, न चाखता भेसळीची ‘ही’ सहा चिन्हे आधी ओळखा
लक्षात घ्या पूर्णतः गोड साखरेसारखं संत्र तुम्हाला मिळणार नाही किंवा जर असेल तर ते केमिकलचा वापर करून पिकवलेले असू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे संत्रे हे लिंबू गटातील फळ आहे. यामध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन सी व सिट्रिक ऍसिड असते त्यामुळे याची चव नैसर्गिकरित्या आंबट गोड असतेच. केवळ गोड खाल्ल्याने होणारी ऍसिडिटी टाळण्यासाठी निसर्गाने केलेली ही तरतूद म्हणता येईल. पण गुणवत्तेच्या बाबत हलगर्जी नको म्हणून वरील पाच टिप्स वापरून संत्री खरेदी करा.