घराच्या किचन आणि बाथरुममधील हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचा वापर केला जातो. एक्झॉस्ट फॅनमुळे किचनमधील गरम हवा बाहेर जाण्यास मदत होते. पण एक्झॉस्ट फॅन सतत चालू राहिल्यास त्यात अनेक समस्या निर्माण होतात. अनेकदा फॅन मध्येच बंद पडतो तर काहीवेळी त्यातून जोरजोरात आवाज येऊ लागतो. अशावेळी तातडीने इलेक्ट्रिशयनला बोलावून समस्या सोडवली जाते. पण काही स्वस्त जुगाड वापरुन तुम्ही काही मिनिटांत फॅन साफ कराल शिवाय त्यातून येणारा आवाज बंद करु शकता.
एक्झॉस्ट फॅनमधून आवाज का येतो?
१) पंख्यावर खूप धुळ जमा होणे
२) कमी व्होल्टेज
३) वायर आणि इतर वस्तूंवर पंखा घासणे
४) मोटर खराब होणे
एक्झॉस्ट फॅनमधील धुळ स्वच्छ करण्यासाठी उपाय
एक्झॉस्ट फॅनवर खूप धुळ जमा झाल्याने त्यामधून जोर-जोरात आवाज येऊ लागतो, अशावेळी फॅन स्वच्छ करून येणारा आवाज बंद करु शकता.
यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडाची पेस्ट तयार करा. पंख्यावर लावा आणि काही वेळ राहू द्या. नंतर कापडाने हलके घासून स्वच्छ करा. यावेळी केवळ पंखाच नाही तर त्याभोवतीची जागाही नीट झाडूने स्वच्छ करुन घ्या, नाहीतर ती धुळ पुन्हा फॅनमध्ये जमा होण्याची शक्यता असते.
फॅनमधील पार्ट सैल झाल्यास करा ‘या’ गोष्टी
एक्झॉस्ट फॅनमधील तासनतास चालू ठेवल्यास त्यातील पार्ट सैल होतात आणि जोरजोरात आवाज येऊ लागतो. अशावेळी फॅन बंद करुन व्यवस्थित तपासा आणि त्यातील पार्ट पुन्हा नीट फिट करुन घ्या.
एक्झॉस्ट फॅनचा आवाज बंद करण्यासाठी वापरा ‘हा’ उपाय
अनेकदा एक्झॉस्ट फॅनमधून का आवाज येतोय हे समजत नाही. अशावेळी तुम्ही फॅनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तेल सोडून आवाजापासून सुटका मिळवू शकता. अशाने एक्झॉस्ट फॅनमधील मशीन पुन्हा नव्यासारखी काम करू लागते.
अशावेळी इलेक्ट्रिशियनला बोलवावे लागेल
वरील सर्व उपाय करुनही फॅनमधून आवाज कमी होत नाही किंवा थांबत नसेल तर तुम्हाला इलेक्ट्रिशियनची मदत घ्यावी लागते.