हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण दिनचर्येत अनेकांसाठी सुखाची झोप दुरापास्त झाली आहे. आरोग्यावरदेखील याचे विपरित परिणाम होतात. कामावरून दमूनभागून घरी गेल्यानंतर दिवसभराचा थकवा दूर होऊन चांगली झोप मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. योग्य काळजी घेतल्यास तुमच्यापासून दूर पळालेली ही सुखाची झोप पुन्हा प्राप्त करू शकता. येथे देण्यात आलेल्या गोष्टींचा जरूर विचार करून त्याप्रमाणे आचरण करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसाचे नियोजन – दररोज चांगली झोप मिळण्यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी दिवसाचे योग्य शेड्युल तयार करावे. तसेच वेळेत झोपण्याची सवय लावावी. अनेकजण आठवड्याच्या शेवटी उशिरापर्यंत जागरण करतात आणि नंतरच्या दिवसांमध्ये लवकर झोपण्याचा प्रयत्न करतात. असे करणे चुकीचे असून, रोज निश्चित वेळी झोपणे गरजेचे आहे.

रात्रीचे जेवण – तुमचे रात्रीचे जेवणदेखील तुमच्या झोपेवर प्रभाव टाकते. रात्रीचे जेवण तुमच्या प्रकृतीला अनुसरून न केल्यास त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. त्यामुळे रात्री कमी जेवावे आणि आपल्या प्रकृतीला त्रास होणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळावे. जसे की तुम्हाला गॅसचा त्रास असल्यास गॅस वाढविणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये. पित्तकारक प्रकृती असल्यास जळजळ होईल अशा पदार्थांचे सेवन टाळावे. रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच बिछान्यावर न पडता, शतपावली करावी.

गॅझेटसना दूर ठेवा – गॅझेटस् ही जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. गॅझेटसचा योग्य प्रकारे वापर न केल्यास ती आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. रात्री उशिरापर्यंत गॅझेटसमध्ये अडकून राहिल्यास तुम्हाला झोपायलादेखील उशीर होतो. परिणामी तुमच्या तणावात वाढ होते. याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी जवळजवळ अर्धा तास आधी गॅझेटसला बाय-बाय करावे.

प्रसन्न वातावरण – बेडरूमध्ये प्रसन्न वातावरण ठेवा. झोपण्यापूर्वी तुमच्या आजूबाजूला आनंददायी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. बेडरूम नेहमी स्वच्छ ठेवा. बेडरूममध्ये अती गरम अथवा थंड वातावरण असल्यास चांगली झोप लागणार नाही. त्यामुळे शरिराला अनुकूल असे वातावरण ठेवा.