असे बरेच लोक आहेत जे लठ्ठ नसतात पण त्यांचा चेहरा थोडा जड दिसतो. त्याच वेळी, अनेक सडपातळ लोक देखील डबल चिनच्या समस्येला झुंज देत असतात. अशा परिस्थितीत वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्कआऊटसोबतच खाण्यापिण्याच्या सवयींवरही लक्ष दिले पाहिजे. मुळे मग विनाकारण त्यांचा चेहरा शरीरापेक्षा अधिक मोठा दिसू लागतो आणि ते आहेत त्यापेक्षा आणखीनच जाड दिसतात. डबल चिनमुळे चेहऱ्याचा रेखीवपणा देखील कमी होतो आणि चेहरा बेढब होऊन उगाच वय वाढल्यासारखं दिसतं.मात्र, योग्य टिप्सच्या मदतीने चेहऱ्यावर जमा झालेली चरबी दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया अशाच काही सोप्या टिप्सबद्दल.
डबल चिन म्हणजे काय
डबल चिनची समस्या घशाच्या जवळच्या स्नायूंचे रक्त परिसंचरण कमी झाल्यामुळे उद्भवते.
नेक रोटेशन (neck rotation)
नेक रोटेशन म्हणजे गोलाकार पद्धतीने मान हलवणे. यामध्ये सुरुवातीला क्लॉकवाईज आणि नंतर ॲण्टीक्लॉकवाईज पद्धतीने मान फिरवावी. यातही सुरुवातीला ३ वेळा हळूवार मान फिरवा आणि त्यानंतर पुढचे २ वेळा थोडी जलद मान फिरवावी. हा व्यायाम केल्याने मान, गळा या भागातील रक्ताभिसरण तर वाढतेच पण तेथील वेगवेगळ्या ग्रंथींचे कार्यही सुधारते.
चेहऱ्याचा मसाज (face massage)
जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल, तर तुम्हाला सकाळी उठून मसाज करावा लागेल. उभे असताना किंवा बसून २ ते ३ मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. कपाळापासून मसाज सुरू करा आणि नंतर हळूहळू गालावरून मानेपर्यंत जा.
गोड पदार्थ खाणं टाळा ( Sweet dish)
गोड पदार्थ हे नेहमीच आरोग्यासाठी धोकादायक मानले गेले आहेत. त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील चरबी नाहीशी करायची असेल तर तुम्हाला गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करावे लागेल.
पुरेशी झोप घेणे
निरोगी आयुष्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी नाहीशी करायची असेल तर तुम्हाला रोज ७ ते ८ तास झोपावे लागेल. चांगली झोप तुमच्या शरीरात साठलेली चरबी कमी करते. पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या चेहरा सुजतो.
हेही वाचा – टक…टक…टक! छताच्या पंख्याच्या आवाजामुळे वैतागला आहात? हे पाच सोपे उपाय ठरतील फायदेशीर
व्यायाम आवश्यक (Exercises For Double Chin)
जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर त्याचे फायदे तुमच्या शरीरावर तर दिसतातच पण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमकही येते. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासोबतच तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी राहता. यामुळे चेहऱ्यावरील चमकही कायम राहते. व्यायामासोबतच भरपूर पाणी प्यावे.