घरातील गुळ- साखरेच्या डब्ब्याला अनेकदा हमखास लाल मुंग्या येतात. यात उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला मुंग्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. किचनमधील सिंकच्या आजाबाजूला, ओट्यावर या मुंग्यांची रांग लागलेली दिसते. काहीवेळी या मुंग्या अगदी बारीक असतात तर काहीवेळा मोठ्या लाल चावणाऱ्या मुंग्या असतात. अशावेळी कीटकनाशके वापरत आपण मुंग्यांपासून सुटका करु घेतो. पण पुन्हा या मुंग्या येतात. अशावेळी आम्ही तुम्हाला घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी अतिशय सोपे ४ घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे घरात पुन्हा एकही मुंगी दिसणार नाही. चला तर मग जाणून घेऊ…

लाल मुंग्या घालवण्यासाठी घरगुती उपाय

१) डिश वॉश आणि पाणी

एका बाटलीत तुम्ही डिश वॉश आणि काहीप्रमाणात पाणी घ्या. यानंतर हे मिश्रण नीट शेक करा. आता घरात ज्याठिकाणी मुंग्यांची रांग लागली आहे तिथे स्प्रे करा, यामुळे मुंग्या काही क्षणात गायब होतील.

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार
Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?
How long to boil eggs
कच्ची अंडी किती वेळ उकळायला हवी? अंडी उकडण्याची ३- ३- ३ पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का?
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ

२) व्हाईट व्हिनेगर आणि पाणी

पाण्यात व्हाईट व्हिनेगर टाकून तुम्ही मुंग्यांवर स्प्रे करण्यासाठी एक कीटकनाशक बनवू शकता. यासाठी एक स्प्रे बाटलीत अर्धा कप पाणी आणि अर्धा कप व्हाईट व्हिनेगर टाका आणि ते मुंग्यांवर स्प्रे करा.

३) लिंबाचा रस आणि पाणी

जर तुम्हाला व्हिनेगरचा वास आवडत नसेल तर तुम्ही लिंबाचा रस आणि पाणी हे मिश्रणही मुंग्या दूर करण्यासाठी वापरु शकता. यासाठी एका लिंबाच्या रसमध्ये तीन कप पाणी मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा. आत हे मिश्रण घरात ज्याठिकाणी मुंग्यांची रांग आहे तिथे स्प्रे करा.

४) बोरिक ऍसिड

बोरिक ऍसिड हे मुंग्यांसाठी विष म्हणून काम करते. ज्यामुळे मुंग्या काही क्षणात मरतात. ज्याठिकाणी जास्त मुंग्या दिसतात तिथे हे स्प्रे करा. याशिवाय बोरिक ऍसिड शुगर ट्रॅप देखील बनवू शकता. यासाठी बोरिक ऍसिडमध्ये शुगर सिरप मिक्स करा आणि कार्डबोर्डवर टाका, या कार्डबोर्डवर मुंग्या येतात मरुन जातील.

घरात आलेली लाल मुंग्यांची रांग घालवण्यासाठी घरगुती उपाय

लाल मुंग्या खूप वेगाने चावतात. त्यामुळे त्यांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी लाल मिरची, दालचिनी आणि लिंबाची साल ठेवा. याशिवाय मुंग्या तेलापासून दूर पळतात. यामुळे एक कप पाण्यात तेलाचे 10 थेंब मिसळा आणि हे द्रावण घराच्या आत आणि बाहेर स्प्रे करा. ज्यामुळे मुंग्या घरातून काही मिनिटांत गायब होतील.

Story img Loader