डोळे हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहेत. डोळ्यांशिवाय आपल्याला या जगाचं सौंदर्य कधीच अनुभवता येणार नाही. त्यामुळे डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. काहींचे डोळे अतिशय सुंदर, बोलके आणि पाणीदार असतात पण अशा या सुंदर डोळ्यांखाली जर का काळे डाग दिसू लागले तर? ‘डार्क सर्कल’ म्हणजेच डोळ्यांखालील काळे डाग हे आपल्या डोळ्यांचे सौंदर्य कमी करतात. तुम्हीदेखील ही समस्या अनुभवली आहे का? पण आता काळजी करू नका; कारण आम्ही तुमची ही समस्या सोडविण्यासाठी मदत करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला काळे डाग कमी करण्यासाठी आणि डोळ्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या…
डोळ्यांखाली काळे डाग का येतात?
डोळ्यांखालील काळे डाग दूर करण्याआधी त्यामागील कारण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डोळ्यांखाली काळे डाग येण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकता. अनेकदा आपली झोप पूर्ण होत नाही किंवा शांत झोप लागत नाही पण वारंवार असे घडत असल्यास डोळ्यांखाली काळे डाग येऊ शकतात. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा खूप जास्त ताण घेत असाल तरीही डोळ्यांखाली काळे डाग येतात. त्याचबरोबर हार्मोन्समुळे, आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे डोळ्यांखाली काळे डाग येतात. प्रत्येकासाठी डोळ्यांखाली काळे डाग येण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. तुम्हाला वरीलपैकी कोणत्या समस्येमुळे काळे डाग पडले आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे; कारण त्यानुसार जीवनशैलीत योग्य बदल करून तुम्ही डोळ्यांखालील काळे डाग कमी करू शकता. तसेच काही सोपे घरगुती उपायदेखील करून पाहू शकता, ज्यामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होईल पण गरज असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
हेही वाचा – गूळ की साखर, तुमच्या त्वचेसाठी काय आहे चांगले? डॉक्टरांकडून जाणून घ्या
डोळ्यांखालील काळ्या डागांपासून सुटका मिळविण्यासाठी काही घरगुती उपाय-
- दही आणि हळद यांचे एकत्र मिश्रण करून त्याचा लेप डोळ्यांखाली लावल्यास काळे डाग कमी होऊ शकतात. पण लेप लावताना डोळ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या!
- थंड दूध डोळ्यांखाली लावल्यानेदेखील काळे डाग कमी होऊ शकतात.
- बटाट्याचा रस काढून, त्यात लिंबाचा रस मिसळून डोळ्यांखाली लावल्यास काळे डाग कमी होण्यास मदत होऊ शकते. हा रस काळजीपूर्वक डोळ्यांखाली लावा.
- टोमॅटोचा रस काढून त्यात लिंबाचा एक चमचा रस मिसळून चेहऱ्याला लावल्यास काळे डागक मी होण्यास मदत होऊ शकते. हा रस लावताना काळजी घ्या.
- संत्र्याची साल उन्हात सुकवून घेऊन त्याची पावडर करून घ्यावी. त्यामध्ये थोडे गुलाबजल मिसळून त्याचा लेप तयार करून चेहऱ्याला लावा, जेणेकरून डोळ्यांखालील काळे डाग कमी होऊ शकतात.
हेही वाचा- ग्लासभर कलिंगडाचा रस प्यायल्याने उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी बरी होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
हे घरगुती उपाय सामान्यत: काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात पण तरीही फरक न पडल्यास तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.