How to Get Rid of Lizards at home : घरात पाल फिरताना पाहिली की किळस येतो. बाजारात पाल मारण्यासाठी विषारी द्रव्य मिळते पण घरात लहान मुले असताना किंवा पाळीव प्राणी असताना असे विषारी द्रव्ये घरात आणायची इच्छा होत नाही. याशिवाय पाल मारावी, असेही वाटत नाही. मग अशात घरातील पालीपासून कशी मुक्ती मिळवायची, असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर घरातून पाल पळवायचे अनेक उपाय सांगितले जातात पण प्रत्येक उपाय कामी पडेल, असे नाही पण काही उपाय केल्याने याचा फायदा दिसून येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घरात पाल येऊ नये म्हणून एक खूप सोपा उपाय सांगितला आहे. चला तर जाणून घेऊ या.
घरगुती उपाय
या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे एका भांड्यामध्ये डासांची कॉइल घ्या आणि तुरटीचा लहान खडा घ्या.ही तुरटी आणि कॉइल बारीक एकत्र वाटा आणि पेस्ट करा.त्यानंतर एका ग्लास पाणी घ्या आणि या पाण्यामध्ये ही पेस्ट टाका. त्यात लाल मिरच्या घाला आणि बेकींग सोडा व मीठ टाका. त्यानंतर हे पाणी पाच मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर हे गरम केलेलं पाणी थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर हे पाणी एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरा आणि घरामध्ये जिथे पाल येते अशा ठिकाणी हा स्प्रे मारा. जर तुम्हाला पाल डोळ्यासमोर दिसली तर हा स्प्रे तिच्या अंगावर मारा. या स्प्रेमुळे ती घराबाहेर पळून जाईल. ही ट्रिक तुम्हीही घरी वापरू शकता. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही सहज घरातील पाल पळवू शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : उन्हाळ्यात बनवा थंडगार, चटकदार ‘मसाला ताक’, जाणून घ्या सोपी रेसिपी
prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुरटीने मिनिटांत पाली घरातुन पळुन जातील” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रचंड किळस येतो” तर एका युजरने विचारलेय, “झुरळ कसे घालवायचे?” आणखी एका युजरने विचारलेय, “घरातून उंदीर कसे पळवायचे?”