Home Made Mosquito Repellent: तुम्ही घरात शिरणारे मच्छर आणि घोंघवणाऱ्या माश्यांमुळे वैतागला आहात का? माश्या घरात दुर्गंधी पसरवतात आणि मच्छर चावल्यास मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे मुलांना आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी वाटणे सहाजिक आहे. पण चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे मच्छर किंवा माश्या तुमच्या घराच्या आसपास देखील भटकणार नाही. हा उपाय अगदी सोपा आहे. तुम्ही झटपट मच्छर आणि माश्यांपासून सुटका मिळवू शकता आणि कुटांबाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नारळाचं झाड कसं लावावं? जाणून घ्या सोपी पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ

खोबऱ्यासाठी नारळ आपटून वैतागलात? नारळ फोडण्याची ‘ही’ सोपी पद्धत एकदा वापरून पाहा

कडूलिंब आणि नारळाचे तेल, मच्छर आणि माश्यांना घरापासून ठेवेल दूर

  • कडलिंबाचा पाला स्वच्छ धूवून घ्या.
  • नारळाचे तेल गरम करुन त्यात हा कडलिंबाचा पाला टाकून उकळून घ्या.
  • त्यानंतर तेल गाळून घ्या. थंड होऊ द्या.
  • हे तेल एका बाटलीत साठवू शकता.
  • या तेलाचा दिवा लावून त्यात कापूरचा चुरा करून टाका. घरात आणि गार्डनमध्ये ठेवा.

हेही वाचा – ”जय हनुमान ज्ञान गुण सागर”, बोबड्या बोलीत चिमुकलीने गायलेली हनुमान चालिसा एकदा पाहाच…

कडूलिंबाचा पाला वापरून तयार केलेले ते नारळाच्या तेलाचा गंध इतका तीव्र असतो की, तुमच्या घरापासून मच्छर आणि माश्या दूर राहतील. आजच करून पाहा हा सोपा उपाय.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get rid of mosquitoes or flies home made mosquito repellent watch the viral video snk
Show comments