Mouth Ulcers Home Remedies : उन्हाळा असो किंवा हिवाळा, अनेकदा तोंड येण्याची समस्या नेहमी उद्भवते होते अशावेळी आपण काही खाऊ किंवा पिऊ शकत नाही. तोंडात काहीही टाकताच जळजळ आणि तीव्र वेदना होतात. हे समस्या सहसा जीभ, हिरड्या, ओठांवर, तोंडाच्या आत किंवा घशात जाणवते. ही समस्या अगदी सोपी वाटत असली तरी यावर वेळीच उपचार न केल्यास ही मोठी समस्या बनू शकते. अनेक कारणांमुळे फोड येऊ शकतात. काही वेळा शरीरातील उष्णता वाढल्यानेही फोड येतात. पण वारंवार तोंड येणे हे देखील मोठ्या समस्येचे कारण असू शकते. त्यामुळे जर तुम्हीही तोंडाच्या अल्सरने त्रस्त असाल आणि घरगुती उपाय शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही त्यावर मात करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वारंवार तोंड येत असेल तरय हे उपाय करा

१. ब्लॅक टी-

तोंड येणे दूर करण्यासाठी तुम्ही ब्लॅक टीचा वापर करू शकता. काळ्या चहासोबत थेट घेतल्यास तोंड येण्यापासून आराम मिळतो. ब्लॅक टीमध्ये असलेले टॅनिन बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देतात. यासाठी तुम्हाला ब्लॅक टी बॅग एक कप गरम पाण्यात भिजवावी लागेल आणि काही वेळाने पिशवी थंड झाल्यावर फोडांवर लावा. यामुळे अल्सरपासून आराम मिळेल.

हेही वाचा – Coconut Peel : नारळाच्या शेंड्या फेकून देताय? पण त्याचे आहेत अनेक फायदे, कसा करू शकता त्यांचा वापर, जाणून घ्या

२. दही-

दही हे प्रोबायोटिक आहे जे आतड्यांसाठी चांगले मानले जाते. तोंडाच्या फोडांपासून सुटका हवी असेल तर दह्याचे सेवन करू शकता. दह्याचा कूलिंग इफेक्ट असतो जो अल्सरची जळजळ कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

हेही वाचा – दिवसातून दोनदा कॉफी प्यायल्याने तुमच्या यकृताचे रक्षण होऊ शकते का? संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर, जाणून घ्या…

३. लवंग

लवंगामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि वेदनाशामक गुणधर्म फोडाचे जंतूंपासून संरक्षण करतात, ते लवकर बरे होण्यास मदत करतात आणि वेदनापासून आराम देतात.

टिप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get rid of mouth ulcers home remedies snk
Show comments