हिवाळा असो किंवा उन्हाळा पायांना धूळ आणि रखरखीत उन्हापासून वाचवण्यासाठी तसेच त्यांना आराम मिळावा यासाठी अनेकजण पायात बूट घालणे पसंत करतात. मात्र उन्हाळ्यमध्ये बूट घातल्यानंतर अनेकांना एक समस्या सतत सतावत असते. ती म्हणजे, उन्हाळ्यात पायांना आणि बुटातून येणारा घामाचा घाणेरडा वास. घराबाहेर असताना सतत आपल्या पायात बूट आणि मोजे असतात. मात्र घरी आल्यानंतर जेव्हा हे बूट-मोजे काढतो, तेव्हा सहन न होणारा असा अत्यंत उग्र दर्प घरभर पसरतो.
मात्र आता यावर काय करावे? काही जण बुटांमधील हा वास घालवण्यासाठी, त्यामध्ये चांगल्या वासाचे सेंट किंवा सुगंधी पावडर घालून ठेवतात. परंतु असे काहीही करण्याआधी, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील masteringhacks नावाच्या अकाउंटने दाखवलेली एक भन्नाट ट्रिक पाहा. बुटांचा घाणेरडा वास दूर व्हावा यासाठी नेमकी कोणती ट्रिक आहे ती पाहू.
हेही वाचा : Home gardening : घरच्या कुंडीत ‘कोथिंबीर’ लावताना काय करावे, काय नको? पाहा या टिप्स
बुटांचा वास कसा घालवावा?
सर्वप्रथम तुम्ही घालत असेलेल्या बुटांच्या आतमध्ये असलेला मऊ सोल बाहेर काढून घ्या.
आता त्या सोलवर पायात घातला जाणारा मोजा घालून घ्या. ही क्रिया दोन्ही बुटांमधील सोलसह करावी.
मोजे घातलेले सोल पुन्हा बुटांमध्ये होते तसे घालून ठेवा.
तुम्ही कुठेही बाहेर जाणार असाल तेव्हा मोजे घातलेले सोल बुटात तसेच ठेवावे. बूट घालताना तुमच्या पायातसुद्धा आवर्जून मोजे घाला.
ही युक्ती वापरल्याने तुमच्या पावलाला तसेच बुटांमधून दुर्गंधी येणार नाही. असे शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.
ही ट्रिक नेमकी काम कशी करते आणि त्याचे फायदे काय?
बुटाच्या आत घातलेले मोजे, पायाला येणारा घाम टिपण्याचे काम चांगल्या पद्धतीने करते. त्यामुळे घामाचा वास बुटांमध्ये राहत नाही. परिणामी तुमच्या बुटांमधून दुर्गंधी किंवा उग्र वास येत नाही.
बुटांना वास येऊ न देण्याची ही एक अत्यंत साधी, सोपी आणि स्वस्तात मस्त अशी युक्ती आहे.
बुटाच्या आत मोजे असल्याने, बुटांचा मऊपणा वाढतो. तसेच, तुमच्या पायांना अधिक अराम मिळण्यास मदत होऊ शकते. असे काही फायदेदेखील सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडीओमधून सांगण्यात आले आहेत.
तर मग, तुम्हीदेखील पायात नेमही बूट घालत असाल आणि तुम्हालादेखील त्यांची दुर्गंधी घालवायची असेल तर हा सोपा आणि स्वस्तात मस्त असा उपाय करून बघू शकता.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @masteringhacks नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत २३.८K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.