आपण बाहेरगावी गेलो असल्यास, बंद घर पाहून एक नको असलेला पाहुणा आपल्याच घरात घर करून राहतो आणि सर्व डबे, प्लास्टिकच्या वस्तू, कपडे कुरतडून ठेवतो. असा हा उंदीर एकदा आपल्या घरात घुसला की मग जायचं नाव घेत नाही. हा त्रास अगदी चाळीत राहणाऱ्या व्यक्तीपासून ते मोठ्या टॉवरमधील घरापर्यंत सगळ्यांकडे असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा उंदरांना मारण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. परंतु, अनेकदा ती औषधं खाऊन तो उंदीर घरातच कुठल्यातरी कोपऱ्यात जाऊन आपला जीव सोडतात. मग चार-पाच दिवसांनी त्याचा घाणेरडा वास घरात पसरला, की तो मेलेला उंदीर शोधून त्या जागेची साफसफाई करावी लागते. औषध नाही तर त्या चिकट पट्ट्यांचा वापर करून त्या पट्ट्यांना चिकटलेला उंदीर हाताने उचलून, घराबाहेर टाकून द्यायलादेखील किळस येते.

हेही वाचा : स्वयंपाकघरात एकही झुरळ दिसणार नाही; घरातील उदबत्त्या अन् कापूर करतील तुमची मदत! पाहा ही सोपी हॅक….

यापैकी कोणताही पर्याय न वापरता, घरात उंदीर येऊ नये किंवा घरातील उंदीर स्वतःहून बाहेर पळून जाण्यासाठी युट्यूबवरील puneritadka नावाच्या एका अकाउंटने दोन भन्नाट घरगुती उपाय सांगितले आहेत, ते पाहा आणि घरी प्रयोग करून पाहा.

१. उपाय पहिला

साहित्य

१-२ चमचे गहू [कोणतेही धान्य]
लाल तिखट
साबण
तोंडाला लावायची पावडर
पाणी
डेटॉल
टिशू पेपर

हेही वाचा : kitchen tips : तव्यावरील चिकट-काळा थर १० मिनिटांत होईल साफ! ही ट्रिक एकदा पाहाच…

कृती

  • सर्वप्रथम नको असलेल्या एका प्लास्टिकच्या डब्यात चमचाभर गहू [किंवा कोणतेही धान्य] घ्यावे.
  • त्यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घ्या.
  • त्याचबरोबर थोडासा अंगाला लावायचा किंवा कपड्यांचा साबण किसून घालावा.
  • त्यावर उन्हाळ्यात अंगाला लावतो ती पावडर किंवा तोंडाला लावायची पावडर आणि पाण्याचे काही थेंब टाकून सर्व गोष्टी चमच्याने मिसळून घ्या.
  • आता या मिश्रणात काही थेंब डेटॉल मिसळून पुन्हा सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्याव्या.
  • सर्वात शेवटी या मिश्रणत थोडे कोरडे गहू मिसळून घ्या.
  • उंदरांना पळवून लावणारे मिश्रण तयार झाले आहे.
  • हे मिश्रण टिशू पेपरमध्ये भरून त्याची छोटी पुडी करावी. या मिश्रणाच्या तुम्हाला हव्या तेवढ्या पुड्या करून घ्या.
  • आता घरामध्ये उंदीर जिथे घुसून बसतात, अशा ठिकाणी या पुड्या ठेवून द्या.
  • या पुड्या तुम्ही घराच्या दाराशी ठेवल्यास या मिश्रणाच्या वासाने उंदीर घरात येणार नाहीत.

२. उपाय दुसरा

साहित्य

मैदा
हँडवॉश
पाणी

कृती

  • प्लास्टिकच्या डब्यात एक चमचाभर मैदा घ्या.
  • त्यामध्ये थोडे हँडवॉश टाकून घ्या.
  • आता या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्या.
  • आता यामध्ये थोडेसे पाणी घालून मिश्रण हाताने एकजीव करून घ्या.
  • मैदा आणि हँडवॉशची घट्ट पेस्ट तयार झाल्यानंतर, त्याचे लहान लहान गोळे बनवून घ्या.
  • या गोळ्यांना स्वयंपाकघर, पलंगाखाली, कपाटाखाली अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्यावे.
  • या गोळ्यांच्या वासाने उंदीर, गोळी ठेवलेल्या ठिकाणी मुळीच फिरकणार नाहीत.
  • तुम्ही बाहेरगावी जात असल्यास या गोळ्यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

अशा घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी किंवा त्यांना घरात येऊ न देण्यासाठी हे दोन उपाय युट्यूबवरील @puneritadka नावाच्या चॅनेलवरून शेअर झाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get rid of rats in house fast without killing them try these 2 simple home remedies dha