How to get rid of rats: दिवाळी तोंडावर आली असून सर्वत्र साफसफाईची लगबग सुरू आहे. घराची साफसफाई म्हटली की सर्व घर साफ करणं आलंच. मात्र त्यामध्ये त्रास देतात ते म्हणजे उंदीर. घरात एकदा का उंदीरांचा वावर वाढला की त्रास हा होतोच. त्यांना कितीही घालवण्याचा प्रयत्न केला तरीही ते पुन्हा दिसतातच. उंदीर केवळ घाणच पसरवत नाहीत तर कपडे आणि इतर गोष्टीही कुरतडतात. उंदीर मारण्यासाठी तुम्हाला बाजारात अनेक औषधे मिळतील, परंतु आज आम्ही अशा टिप्सबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही उंदरांना न मारता घराबाहेर काढू शकता.

कांद्याचा वास

उंदरांना कांद्याचा वास सहन होत नाही. याचा फायदा आपण उंदरांना हाकलण्यासाठी करू शकतो. उंदीरांना घराबाहेर ठेवण्यासाठी कांद्याचे तुकडे करून उंदरांच्या लपण्याच्या जागी ठेवा. दुरून कांद्याचा वास आल्यावरच उंदीर पळून जातील.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO

( हे ही वाचा: Cholesterol Control Diet: कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी व्हिनेगर कांदा ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे)

लसणाचा स्प्रे

लसणाच्या वासाने उंदीर पळून जातात. उंदरांना हाकलण्यासाठी लसणाचा विशेष वापर केला जातो. लसूण बारीक चिरून घ्या आणि थोड्या पाण्यात मिसळा. त्यानंतर ते पाणी चांगले मिक्स करून उंदरांच्या लपण्याच्या जागेवर शिंपडा. यासोबतच तुम्ही लसूण कापून उंदीरांची जागा असेल त्या ठिकाणी ठेवू शकता. याच्या वासामुळे तुमच्या घरातून उंदीर निघून जातील.

लाल तिखट

लाल मिरची ही धोकादायक गोष्ट आहे. उंदीर लाल मिरचीला खूप घाबरतात. उंदरांना हाकलण्यासाठी घराच्या कोपऱ्यात, सिंकच्या खाली आणि उंदीर लपलेल्या इतर ठिकाणी लाल तिखट टाका. त्यामुळे घरात उंदीर येणे बंद होतील.

( हे ही वाचा: Late Night Eating Habit: तुम्हालाही अचानक मध्यरात्री भूक लागते का? ‘हे’ ४ उपाय करा, पोटही भरेल आणि वजनही नियंत्रणात राहील)

लवंग तेल

लवंगाच्या वासाने उंदीरही पळून जातात. यासाठी एक मखमली कापड घ्या आणि त्यावर लवंग तेल शिंपडा. यानंतर त्या कापडाचे तुकडे उंदरांच्या आवडत्या ठिकाणी ठेवा. याच्या वासाने उंदीर पळून जातील. लवंगाच्या कळ्याही मखमली कापडात गुंडाळून उंदरांच्या लपण्याच्या ठिकाणी ठेवता येतात.