Home Remedies of Red Ants: घरात मुंग्या कमी प्रमाणात येत असतील तर त्यांचा त्रास एवढा जाणवत नाही. पण, जर त्यांचा वावर जास्तच वाढला तर मात्र त्यांचा त्रास सहन होत नाहीत. या मुंग्या तुमच्या अन्नाची नासाडी तर करतातच पण शरीरावर चावा घेऊन त्रासही देऊ शकतात. जर तुम्हालाही मुंग्यांशी संबंधित अशी समस्या भेडसावत असेल तर आज आम्ही तुम्हाला यापासून मुक्ती मिळवण्याचे ५ सोपे उपाय सांगत आहोत. या उपायांनी मुंग्या दिसणे लगेच थांबेल.
मुंग्यांना पळवण्याचे उपाय
दालचिनी
घरात मुंग्या आल्याने तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही दालचिनीचा उपाय करू शकता. यासाठी एका कपमध्ये ७५ टक्के पाणी घ्या आणि २५ टक्के दालचिनी तेल मिसळा. त्यानंतर दोन्ही मिक्स करा. हे मिश्रण चांगले विरघळल्यानंतर, द्रावणात एक सूती कापड भिजवा आणि मुंग्या तुमच्या घरात येणारी जागा या कपड्याने पुसून टाका. दालचिनीच्या वासामुळे मुंग्या घरात येण्यास हिंमत करणार नाहीत.
( हे ही वाचा: Side Effects of Paneer: ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नका पनीर; आरोग्यासाठी ठरू शकते घातक)
पीठ
मुंग्यांना पीठ आवडत नाही. पीठ पाहताच त्या पळून जातात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मुंग्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही पीठ देखील वापरू शकता. जिथे मुंग्यां दिसतात, तिथे तुम्ही पीठ शिंपडू शकता. फवारणी केल्याने त्या ताबडतोब जागेवरून गायब होतील.
व्हिनेगर
मुंग्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्हिनेगर देखील एक प्रभावी उपाय आहे. तुम्ही एका बाटलीत अर्ध्या प्रमाणात व्हिनेगर आणि पाणी मिसळा. यानंतर ते पाणी कपड्यावर शिंपडा आणि स्वयंपाकघरासह त्या ठिकाणी मुंग्या असतात ती जागा पुसून टाका. मुंग्यांना व्हिनेगरचा वास आवडत नाही. दिवसातून २ ते ३ वेळा ही प्रक्रिया केल्याने मुंग्या घरी येणं थांबतील.
( हे ही वाचा: गरोदरपणात सेक्स केल्याने बाळाला त्रास होऊ शकतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात)
खडू
मुंग्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही खडूचाही वापर करू शकता. खरं तर, त्यात कॅल्शियम कार्बोनेट असते, जे मुंग्यांना दूर ठेवण्यास मदत करते. मुंग्यांपासून मुक्त होण्यासाठी, आपण त्यांच्या प्रवेशाच्या काही ठिकाणी चूर्ण खडू स्प्रे करू शकता. यासोबतच त्या खडूतून एक रेषाही काढा. यानंतर मुंग्या तुमच्या घरात घुसण्याची हिंमत करणार नाहीत.
लाल मिरची
लाल मिरचीमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म आढळतात. लाल तिखटामुळे मुंग्यांना वास घ्यायला त्रास होतो. लाल मुंग्यांच्या मार्गावर तुम्ही हे लाल तिखट हळूहळू शिंपडा. तुमच्या घरात मुंग्या येणे बंद होईल.