Home Remedies to Reduce Rat Problems: बहुतेक लोकांच्या घरी ही एक सर्वसाधारण समस्या आहे आणि ती म्हणजे उंदीर. एकदा का उंदीर घरात घुसले की, काहीही केल्या ते घरातून बाहेर जात नाहीत. घरात उंदीर कसे होतील, याचा काही नेम नाही. उंदरांमुळे आपल्याला अनेक समस्यांना, तसेच अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. मग हा त्रास टाळण्यासाठी आपण नाना तऱ्हेचे उपाय करून बघतो. अशा परिस्थितीत तुम्हाला असा काही उपाय सापडला, तर ज्यामुळे तुमच्या घरातील सगळेच्या सगळे उंदीर एकाच वेळी पलायन करतील. तुमच्या मनातील हाच विचार लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला उंदरांना पळवून लावण्याच्या काही वेगळे घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत.
उंदीर पळविण्यासाठी घरगुती सोपे उपाय
१. कांदा आणि लसूण
कांदा आणि लसूण ही एक अशी गोष्ट आहे; जी प्रत्येकाच्या घरी असतेच. अनेकांना कांदा आणि लसणाचा वास आवडत नाही. खरे तर कांद्याचा वास माणसाला सहनही होत नाही. अगदी त्याचप्रमाणे तो उंदरांनाही सहन होत नाही. उंदरांनाही कांदा आणि लसूण यांच्या वासाचा त्रास होतो. त्यामुळे उंदीर पळून जातात. तुम्ही लसणाच्या पाकळ्या जरी ठेचून टाकल्या तरीदेखील त्याचा फायदा उंदीर पळविण्यासाठी होतो. उंदरांपासून दूर राहण्यासाठी चिरलेला कांदा आणि लसूण तुम्ही घराजवळ किंवा घराच्या कोपऱ्यात ठेवू शकता. त्याशिवाय कांदा-लसूण ठेचून पाण्यात टाका आणि उंदीरविरोधक स्प्रे बनवा. या स्प्रेची फवारणी उंदरांवर केली जाऊ शकते.
२. काळी मिरी
उंदरांना हाकलण्यासाठी काळी मिरी बारीक करून, उंदरांवर फेकून द्या. त्याशिवाय काळी मिरी उंदरांच्या बिळाजवळ ठेवावी किंवा अन्नपदार्थांमध्ये काळी मिरी मिसळा आणि अशा ठिकाणी ठेवा; जिथे उंदीर वारंवार त्यांचे खाद्य शोधायला आवर्जून येतात.
३. बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यापासून तुम्ही उंदीर पळवू शकता. बेकिंग सोडा अशा ठिकाणी ठेवा जेथे उंदीर वारंवार येतात. बेकिंग सोडा रात्रभर टाकून ठेवा. सकाळी पावडर पुसून टाका. असं केल्याने तुमच्या घरातील उंदीर पळून जाऊ शकतात.
४. पेपरमिंटचा वापर
पेपरमिंटच्या वासाने उंदीर पळून जातात. उंदरांना दूर ठेवण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पेपरमिंट घातलेला कापसाचा बोळा ठेवा; ज्याच्या वासाने उंदीर लगेच घर सोडून पळून जातील. तसेच पुन्हा ते वावर घरात दिसणार नाहीत. त्यामुळे पेपरमिंट उंदीर घालविण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
अशा प्रकारे तुम्ही वरील उपायांद्व्रारे उंदरांना पळवून लावू शकता.