आजकाल बऱ्याच जणांना कमी वयातच चष्मा वापरावा लागतो. सतत स्क्रीनचा वापर, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले अन्नपदार्थ न खाणे यांमुळे अनेकांना नंबरचा चष्मा लावण्याची वेळ येते. पण सतत चष्मा वापरल्याने नाकावर डाग पडण्याची शक्यता असते. जिथे नाकावर चष्मा असतो ती जागा काळसर, डाग पडल्यासारखी वाटते. या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. काही सोपे उपाय करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
चष्मा वापरल्याने नाकावर पडलेल्या डागापासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरणारे उपाय
ऍलोवेरा जेल
चष्म्यामुळे नाकावर पडणाऱ्या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी ऍलोवेरा जेल उत्तम नैसर्गिक उपाय आहे. यासाठी डाग असणाऱ्या ठिकाणी ऍलोवेरा जेल थोड्या वेळासाठी लावून ठेवा. जर तुम्हाला दिवसा हे शक्य नसेल तर तुम्ही रात्री हा उपाय करू शकता. यामुळे डाग निघून जाण्यास मदत होईल.
आणखी वाचा: आता दूध उतू जाणार नाही; फक्त वापरा ही सोपी ट्रिक
काकडी
काकडी देखील नाक आणि डोळ्यांखालील डागांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर मानली जाते. यासाठी काकडीचे काप थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा त्यानंतर, डाग असणाऱ्या भागावर काही वेळासाठी ठेवा यामुळे फरक जाणवेल.
बदामाचे तेल
चष्म्यामुळे डाग पडलेल्या भागावर बदामाचे तेल लाऊ शकता, रात्रीच्या वेळी याचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरेल.
आणखी वाचा: कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाणी; फक्त वापरा ‘या’ ट्रिक्स
गुलाबपाणी
व्हिनेगरमध्ये गुलाबपाणी मिसळून मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण डाग असणाऱ्या भागांवर लावा, यामुळे डागांपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल.
पुदिना आणि लिंबु
थोडा लिंबाचा रस घेऊन त्यात थोडा पुदिना मिसळून मिश्रण तयार करा. त्यानंतर हे मिश्रण नाकावर डाग असणाऱ्या ठिकाणी लावा आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे डागांपासून सुटका मिळण्यास मदत मिळेल.