अनेकजण व्हाईटहेड्सच्या म्हणजेच चेहऱ्यावर येणाऱ्या बारीक, पांढऱ्या पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असतात. व्हाईटहेड्स मुख्यतः नाकावर, गालावर आणि हनुवटीवर दिसून येतात. त्वचेत तयार झालेल्या किराटिनमुळे किंवा त्वचेत असलेल्या फ्लेक्समुळे व्हाईटहेड्स येऊ शकतात. प्रौढ व्यक्तींमध्ये व्हाईटहेड्सची समस्या जास्त दिसून येते. याचे कारण सूर्यकिरणांमुळे त्वचेचे होणारे नुकसान, खराब झालेक्या त्वचेचा परिणाम दिसून येणे हे असू शकते. व्हाईटहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करता येतील जाणून घ्या.
चेहऱ्याला वाफ देणे
चेहऱ्याला वाफ दिल्याने त्वचेत असणारी छिद्र उघडून त्यातील घाण निघून, त्वचा स्वच्छ होते. असे आठवड्यातून २ वेळा केल्यास व्हाईटहेड्सची समस्या कमी होईल.
क्लीनजिंग
हवेतील धूळ, प्रदूषण यामुळे त्वचा खराब होते, क्लीनजिंगमुळे त्वचा स्वच्छ होते.
फेशियल पील
फेशियल पीलचा वापर करून त्वचेवर जमा झालेले धुळीचे कण स्वच्छ केले जातात, यासाठी केमिकलयुक्त मिश्रणाचा वापर केला जातो. पार्लरमध्ये जाऊन तुम्ही फेशियल पील करू शकता.
सनस्क्रीनचा वापर करा
वाढत्या वयानुसार घातक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून रक्षा करण्याची त्वचेची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे बाहेर जाताना नियमितपाने सनस्क्रीनचा वापर करावा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)