Cauliflower : पावसाळ्यात भाज्यांमध्ये अळ्या दिसून येतात. अशात कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या भाज्या खाऊ नये हे समजत नाही. फ्लॉवरमधील अळ्या शोधणे ही खूप कठीण गोष्ट आहे. जर तुम्हालाही फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर तुम्ही ही सोपी ट्रीक वापरू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्लॉवरमध्ये अनेकदा अळ्या लपलेल्या असतात. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरही अळ्या बाहेर येत नाही; अशा वेळी ही सोपी ट्रीक फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा : नवरा-बायकोचे नाते घट्ट कसे करावे? प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्यानंतर करावीत ‘ही’ पाच कामे

फ्लॉवरमधील अळ्या काढा अशा झटक्यात बाहेर

फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर आधी फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करा, यामुळे अळ्या सहज बाहेर पडू शकतात. एका भांड्यामध्ये मीठ टाका आणि त्यात १०-१५ मिनिटांसाठी फ्लॉवरला भिजवून ठेवा. डिहायड्रेशनमुळे सर्व अळ्या झटक्यात बाहेर पडतील. त्यानंतर तुम्ही फ्लॉवर स्वच्छ पाण्याने धुवून वापरू शकता.

याशिवाय तुम्ही कोमट पाण्यात हळद आणि मीठ टाकून १०-१५ मिनिटांसाठी फ्लॉवरला भिजवून ठेवा. यामुळे फ्लॉवरमध्ये अळ्या असतील तर त्या बाहेर पडू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get rid of worm from cabbage cauliflower green vegetables try these home remedies ndj
Show comments