डेनिम हे आजच्या काळातील फॅशन आहे. जवळपास सर्वजण डेनिम वापरतात. पण अनेकांना स्वत:साठी योग्य जीन्स कोणती हे अनेकांना समजत नाही पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही योग्य जीन्स निवडू शकता. प्रत्येक बॉडी टाईपनुसार जीन्स डिझाईन केलेली असते. प्रत्येक जीन्समध्ये काही ना काही फरक असतो. त्यामुळे हे फरक लक्षात घेऊन आपल्या बॉडी टाईपनुसार जीन्स खरेदी करू शकता जी तुम्हाला चांगली दिसेल. चला मग जाणून घेऊ या सोप्या टिप्स
शरीराचे योग्य माप घ्या- जीन्ससह कोणतेही कपडे खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही तुमचे स्तन, कंबर आणि नितंब यांचे योग्य माप घेणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे तुमचा शरीराचा आकार कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्ही समजून घेऊ शकाल. तुमच्या सध्याच्या कंबरेच्या आकारानुसार जीन्स खरेदी करा.
ट्रायल रुमची मदत घ्या- अनेक वेळा ट्रायल रुमसमोरील गर्दीमुळे डेनिम नुसते बघूनच त्यांना तंतोतंत बसेल असा समज लोक करतात. परंतु, जेव्हा तुम्ही ते घरी वापरून पाहता तेव्हा तुम्हाला समजते की, फिटिंग नीट होत नाही. अशा परिस्थितीत ही चूक अजिबात करू नका. जीन्स ट्रायल रूममध्ये जाऊन चेक केल्यानंतर खरेदी करा. तसेच, प्रत्येक डेनिम ब्रँडचा आकाराचा तक्ता वेगळा असतो, त्यामुळे एका ब्रँडच्या डेनिमचा आकार दुसऱ्या ब्रँडच्या डेनिमच्या आकारासारखा असेलच असे नाही. म्हणून टायल रुममध्ये जाऊन जीन्स नीट बसतेय का तपासा.
हेही वाचा – सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
कापड तपासून घ्या – वारंवार कपडे खरेदी करताना जीन्सचे कापड तपासून घ्या. डेनिममध्ये अनेक प्रकारचे कापड असते त्या १०० टक्के कॉटन, कॉटन-पॉलिएस्टर मिक्स, कॉटन-पॉलिएस्टर स्पॅन्डेक्स मिक्स इ. प्रकास असतात. तुम्ही डेनिम खरेदी करताना आधी लेबल पाहा. तुम्हाला जे फॅब्रिक चांगले दिसेल तेच निवडा.
हेही वाचा – Diwali 2023: दिवाळीला कुटूबांपासून दूर आहात? अशी साजरी करा दिवाळी, एकटेपणा जाणवणार नाही
कट देखील तपासून घ्या – नेहमी तुमच्या शरीराच्या आकारानुसार चांगले दिसणारे डेनिम कट निवडा. उदाहरणार्थ, जर तुमच्या शरीराचा आकार Pearच्या फळासारखा असेल तर फ्लेअर्ड पँट निवडा. त्याच वेळी, जर तुमचा शरीराचा आकार सफरचंदाच्या आकाराचा असेल आणि तुमचे पाय पातळ असतील तर तुम्ही टॅपर्ड-फिट पँट निवडा.