How To Get Whiter Teeth at Home: असं म्हणतात माणसाने मोकळेपणाने हसावं, हसल्याने आयुष्य वाढतं. आयुष्यात दहा प्रकारच्या समस्या असताना हसायचं सगळेच विसरून जातात. काहींच्या बाबत तर सगळं काही उत्तम असतानाही हसताना भलताच विचार डोकं पोखरून काढतो. हा विचार म्हणजे पिवळे दात. अगदी रोजच्या रोज दात घासूनही काहींचे दात पिवळेच असतात, यासाठी अनेकदा केमिकल युक्त विविध टूथपेस्ट वापरणे, डेंटिस्टचे महागडे उपाय करणे हे सगळं काही लोक फॉलो करतात पण त्याचा फायदा मात्र होत नाहीच.
हसतील त्याचे दात दिसतील असं म्हणतात आता दात दिसणारच आहेत तर ते निदान छान शुभ्र, पांढरे तरी दिसावेत अशी अनेकांची इच्छा असते. अनेकदा आपल्या काही नेहमीच्या सवयी दातांची शुभ्रता घालवण्याचे कारण ठरतात. आज आपण पांढऱ्या शुभ्र दातांसाठी अगदी स्वस्त आणि घरच्या घरी करता येणारे उपाय पाहणार आहोत.
नारळ तेल
आपण दात स्वच्छ करण्यासाठी नारळ तेल वापरू शकता. पाच मिनिटांसाठी पिवळ्या दातांवर नारळाचे लावा. किंवा ब्रश करताना टूथब्रशवर काही थेंब नारळाचे तेल टाका. ह्या प्रक्रियेत दातांवरचा प्लेक आणि बॅक्टरीया सैल होऊन निघून जातात.
लिंबाची साल
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते.लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात. आपल्या दातांवर लिंबाची साल चोळून नंतर स्वच्छ धुवा. आपण लिंबाच्या सालीची पावडर तयार करून टूथपेस्ट प्रमाणे वापरू शकता. याशिवाय आपण सिट्रस फळे म्हणजे संत्री, मोसंबी, आवळा यांचाही वापर करू शकता.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये अनेक फायदेशीर अँटिऑक्सिडेंट्स असतात यामुळे दाताचा पिवळा थर दूर होण्यास मदत होऊ शकते. सध्या थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीचा सीझन असल्याने हा उपाय आपण नक्कीच करून पाहू शकता.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा.
हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा
काळे मनुके
काळे मनुके चघळले तरी या मनुक्यांमधून बाहेर पडणारे अॅसिडीक गुणधर्म तुमच्या दातांना स्वच्छ करण्यास मदत करता. याशिवाय आपण मनुके किंचित उघडून दातांनाचोळू शकता.
(टीप: वरील उपाय हे घरगुती व प्राप्त माहितीवर आधारित आहेत, गरज भासल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या)