आपणं जितकी केस, चेहरा किंवा हातांची काळजी घेतो तितकी काळजी पायांची घेताना दिसत नाही. पायांच्या सौंदर्याविषयी आपल्याला फारसं काही घेणं देणं नसतं. पण पायांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे त्यातून थंडीच्या दिवसात अधिकच. थंडीच्या दिवसात पायांची त्वचा रुक्ष पडते, पायांना भेगा पडतात त्यामुळे ते आणखी निस्तेज दिसतात. कधी कधी या भेगांतून रक्तही येते. त्यासाठी नियमित घरच्या घरी काही सोपे उपाय करून पाहिले तर नक्कीच भेगा भरण्यास मदत होईल आणि पायांचे सौंदर्यदेखील सुधारण्यास मदत होईल.
…म्हणून दुधात मध घालून पिणे फायद्याचे
– थंडीच्या दिवसांत पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा लावावा, त्यामुळे भेगा लवकर भरतात.
– रात्री झोपताना दुधावरची साय लावली तरी भेगा लवकर भरून पाय कोमल आणि मऊ होतात.
– साखर आणि साय यांच्या मिश्रणाने टाचांवरील भेगांवर साखर विरघळेपर्यंत चोळून घ्यावे, यामुळे देखील भेगा लवकर कमी होतात.
– झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टुथब्रशने टाचा हलके-हलके घासून घ्या. नंतर कपडय़ाने स्वच्छ करून घ्या. हा उपाय करून पाहिल्यास लवकर आराम पडतो.
– टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यावर कांद्याचा रस लावा, यामुळे आपल्या टाचा नरम आणि मुलायम होतात.
प्रदूषणापासून आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा