How do you Identify Pure Kanjeevaram Saree? कांजीवरम साड्यांना आजही इतर पर्याय नाही. लग्नसमारंभात अधिक आकर्षक आणि वेगळे दिसायचे असेल तर पारंपरिक कांजीवरम साडी हा उत्तम पर्याय आहे. कांजीवरम साडी एव्हरग्रीन आहे आणि कोणत्याही कार्यक्रमात रॉयल लुक देण्यासाठी हमखास याची मदत मिळते. मात्र कांजीवरम साडी ओरीजनल आहे हे कंस ओळखायचं. हल्ली दुकानदार कोणत्याही साड्या कांजीवरमच्या नावानं खपवतात, अशावेळी फसवणूक टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला कांजीवरम साड्या कशा ओळखायच्या हे सांगणार आहोत.
कांजीवरम साड्या या दक्षिण भारतातील प्रसिद्ध हस्तकलेचा वारसा आहे. कांजीवरम हे तमिळनाडूमधील एका छोट्या शहराचे नाव आहे जिथे या साड्या शतकानुशतके विणल्या जात आहेत. या साड्या १००% शुद्ध रेशमापासून बनवलेल्या आहेत आणि त्यावर विविध प्रकारच्या डिझाईन्स केल्या जातात. सोन्याची जरी आणि कापूस जरी ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कांजीवरम साड्यांची अनोखी रचना आणि कारागिरी त्यांना आजही खास बनवते.
कशा ओळखणार अस्सल कांजीवरम साड्या?
या सुंदर साड्यांची लोकप्रियता पाहून त्यांच्या अनेक बनावट प्रतीही बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत अस्सल कांजीवरम साडी ओळखणे कठीण होऊन बसते. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही अस्सल कांजीवरम साडी सहज ओळखू शकता. खरी कांजीवराम साडी कशी ओळखायची ते जाणून घेऊया.
वजन :
मूळ कांजीवरम साडी जड नसते, कारण त्यात बहुतेक सिल्कचा वापर केला जातो. मूळ कांजीवराम साड्या अगदी हलक्या असतात कारण त्या शुद्ध सिल्कपासून बनवलेल्या असतात. बनावट साड्यांमध्ये मिश्र सिल्कचा वापर केला जातो ज्यामुळे त्या जड होतात. त्यामुळे साडी जड दिसली तर ती अस्सल नाही असे आपण मानू शकतो.
धागा :
अस्सल कांजीवरम साड्यांमध्ये रेशमी धागे वापरतात जे अतिशय बारीक आणि चमकदार असतात, बनावट साड्या स्वस्त आणि खराब दर्जाचे धागे वापरतात. अस्सल साडीचे धागे मजबूत असतात आणि ते सहज तुटत नाहीत. म्हणून, धाग्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा तपासा. अस्सल कांजीवरम साडी ओळखण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
डिझाइन आणि पॅर्टन :
कांजीवरम साड्यांमध्ये सहसा मोठ्या डिझाईन्स आणि पारंपारिक पॅर्टन असतात. अस्सल कांजीवरम साड्यांवर विणलेल्या डिझाईन्स आणि पॅर्टन अतिशय सुंदर आहेत. या डिझाईन्समध्ये सिल्कवर हाताने भरतकाम केले जाते. बनावट साड्यांमध्ये साध्या आणि सोप्या डिझाइन्स असतात ज्या मशीनने बनवल्या जातात.
उलट बाजूला डिझाइन :
अस्सल कांजीवरम साडी ओळखण्यासाठी, साडीचा पदर किंवा साडीचा भाग आतून बाहेर काढा. जर तुम्हाला डिझाईनच्या दुसऱ्या बाजूला धागे दिसत असतील तर ते अस्सल आहे.
हेही वाचा >> VIDEO: गणपतीला वापरलेल्या फुलांपासून ५ मिनिटांत बनवा घरीच धुप; घर राहील फ्रेश, कायम सुगंधित
किंमत आणि टॅग :
जर तुम्हाला कांजीवरम साडी खूप स्वस्त मिळत असेल तर तुम्ही सावध राहायला हवे. बहुतेक अस्सल कांजीवरम साड्या महाग असतात. अनेक वेळा निर्मात्याचा लोगो किंवा टॅगही अस्सल कांजीवराम साडीला जोडलेला असतो.
भारतातल्या बहुतेकशा साड्यांची नावे ही गावाच्या किंवा शहराच्या नावावरुन दिलेली असतात. कांचीपुरम हे तमिळनाडूमधील प्रसिद्ध विणकामाचे ठिकाण आहे. इथे बनवली जाणारी सिल्कची साडी कांचीपुरम सिल्क म्हणून ओळखली जाते. सोन्याचे धागे वापरुन विणल्यामुळे या साडीला तमिळनाडूची बनारसी साडी असंही म्हटलं जातं. यामध्ये सोन्याच्या धाग्यांबरोबर चांदीचे धागेही वापरले जातात. या साडीविषयी पुरातन काळातल्या अनेक समजुती आहेत. असं म्हटलं जातं की, सुती कापड शंकराला प्रियं आहे, तर रेशीम विष्णुला.