How To Buy Good Cucumbers: उन्हाळ्यात टरबूज, कलिंगडसोबत भरपूर प्रमाणात खाल्ले जाते. अनेकदा आपण ही फळे खरेदी करताना आपण फसतो किंवा चुकीचे फळ खरेदी करतो. तेव्हा पैसे खर्च होतात. अशावेळी उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला आराम मिळतो. उन्हाळ्यात काकडीची मागणी वाढते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करतो. पण जेव्हा काकडी कडू लागते तेव्हा संपूर्ण चव खराब होते. त्यामुळे काकडी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास कडू काकडी खरेदी करण्यापासून आपण वाचू शकतो. कधीतरी तुम्हीही फार हौशीने बाजारातून काकड्या आणल्या असतील आणि कापायला घेतल्यावर त्याचा पहिलाच घास अत्यंत कडू लागला असेल. यापुढे असं होऊ नये म्हणून आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. बाजारात काकडी विकत घेतानाच तुम्ही एका नजरेत कशी काकडीची परीक्षा करू शकता हे जाणून घेऊया..
चांगली काकडी कशी ओळखायची?
१) काकडी खरेदी करताना, गडद हिरव्या रंगाची आणि टणक काकडी निवडा. साधारण फिकट छटा असणाऱ्या किंवा पिवळसर काकड्या जुन्या व जास्त पिकलेल्या असतात. ज्या चवीला कडवट लागू शकतात
२) तुम्ही खरेदीला जाता तेव्हा भाजी हातात घ्या व हलके दाबून पाहा. तुम्हाला कुठेही काकडी नरम झालेली जाणवली तर खरेदी करू नका. जर तुमच्या बोटाच्या दाबाने काकडी तुटत असेल तर ती काकडीत बिया व रस जास्त असल्याचे समजून जा. अधिक जुनाट बिया या कडवट लागतात.
३) दुर्दैवाने, भाज्या जास्त काळ टिकण्यासाठी, बरेच उत्पादक भाज्यांच्या वर मेण लावतात. त्यामुळे तपासण्यासाठी तुमच्या नखांचा वापर करून काकड्या किंचित खरडवून पहा.
४) आकाराने लहान आणि बारीक काकडी निवडा. लहान काकड्या ताज्या असतात आणि त्यात कमी बिया असतात.
५) काकडी सरळ आकाराची असेल असे बघा. वाकड्या काकड्या चवीला कडू शकतात.
काकडी खाण्याचे फायदे
- काकडीत आढळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते जे तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.
- काकडीत फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे अन्न सहज पचते. पोटाशी संबंधित समस्याही याने दूर होऊ शकतात.
- काकडी खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. काकडीमध्ये चांगल्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यामुळे रोज काकडी खाल्ल्याने डिहायड्रेशन टाळता येते.
- काकडीत व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे दृष्टी सुधारते. आहारात काकडीचा समावेश करून डोळे निरोगी ठेवता येतात.