Fake Potato Vs Real Potato: दूध- तूप अगदी लाल तिखट मसाल्यापासून अनेक पदार्थांमध्ये भेसळ होते हे आपणही जाणून असाल. पण सध्या भाज्यांमध्ये आणि ते ही आपल्या आवडत्या बटाट्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढल्याचे समजत आहे. भाजीच्या बाबत साधारण स्वच्छतेचा प्रश्न असतोच, म्हणजे भाजी कुठल्या भागात, कुठलं पाणी वापरून पिकवण्यात आली आहे हे प्रश्न जनसामान्यांच्या मनात असतात. पण भाजी खोटी किंवा खरी असू शकते का हा प्रश्न पाडेल असा प्रकार सध्या बाजारात घडत आहे. बटाट्याचे दोन प्रकार असतात एक म्हणजे चंद्रमुखी व अन्य म्हणजे हेमांगिनी किंवा हेमालीनी. यातील कोणता बटाटा खाण्यास योग्य आहे व तो कसा ओळखायचा हे जाणून घेऊयात..
बटाट्याचे दोन प्रकार कोणते?
हुगळी कृषि सहकारी समितीच्या सदस्यांच्या हवाल्याने झी ने दिलेल्या वृत्तानुसार, चंद्रमुखी बटाटा हा चवीने उत्तम असतो व त्यामुळे आरोग्यालाही फार बाधा पोहोचण्याची शक्यता कमी असते. चंद्रमुखी बटाटा हा साधारण २० ते २५ रुपये प्रति किलो दराने विकला जातो. तर दुसरीकडे हेमांगिनी/हेमालीनी बटाटा हा हायब्रीड किंबहुना भेसळयुक्त बटाटा आहे, या बटाट्याची लागवड सोप्पी व कमी खर्चिक असली तरी त्याची चव चांगली नसते, तसेच त्यात पोषक सत्व सुद्धा कमी असतात. हे बटाटे शिजण्यास खूप वेळ जातोच व अनेकदा ते कच्चेच खाल्ले जातात परिणामी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हेमांगिनी बटाट्याची किंमत १० ते १५ रुपये किलोपर्यंत असते.
हे ही वाचा<< तारक मेहताच्या दया भाभीसारखा झटपट ‘उंधियु’ बनवायचाय? पाहा साधी-सोपी मराठी रेसिपी
चंद्रमुखी व हेमांगिनी बटाट्यात फरक कसा ओळखाल?
कृषि मार्गदर्शक मनोज चक्रवर्ती यांच्या माहितीनुसार, चंद्रमुखी व हेमांगिनी बटाट्यातील फरक अगदी नगण्य आहे.दोघांची त्वचा ही पातळ असते पण मुख्य फरक आपल्याला या बटाट्याचे साल सोलल्यावर दिसून येईल, चंद्रमुखी बटाटा हा सोलल्यावर किंचित मातकट रंगाचा दिसतो तर हेमांगिनी बटाटा पंधरा असतो. चवीलाही चंद्रमुखी बटाटा गोडसर असतो तर हेमांगिनी बटाट्याला काहीच चव नसते.
हे ही वाचा<< दीड लिटर दुधाने बनवा अर्धा किलो तूप; पहा घरगुती सोपी रेसिपी
शिजवण्यासाठी लागणाऱ्या वेळावरूनही आपण ही परीक्षा करू शकता. बाजारातील भेसळयुक्त व शुद्ध पदार्थांची नीट निवड करा जेणेकरून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा धोका कमी होईल.