हिवाळ्यामध्ये अनेक जण जेवणानंतर गूळ खाणे पसंत करतात; तर काही जण साखरेऐवजी सर्व पदार्थांमध्ये चहामध्ये गुळाचा वापर करीत असतात. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या लोह, खनिजे, जीवनसत्त्वे, कॅल्शियम यांसारख्या अनेक पोषक घटकांचे भांडार असते. त्यामुळे या पदार्थाचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला होत असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, आपण आहारात वापरत असलेला गूळ शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखणे गरजेचे असते. आता ते कसे ओळखायचे यासंबंधीच्या काही टिप्सची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखातून मिळाली आहे. ती आपण जाणून घेऊ.

गूळ तयार करण्याची प्रक्रिया ही उघड्यावर आणि अनेक कामगारांच्या हातांतून होत असते. त्यामुळे त्यात कचरा, किडे यांसारखे अनेक अनावश्यक व त्रासदायक घटक अथवा भेसळ असण्याची शक्यता असते; ज्याचा परिणाम गुळाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

भेसळयुक्त गूळ कसा ओळखावा?

१. गोडवा

अनेकदा साखर, गूळ यांसारखे पदार्थ तयार करताना त्यामध्ये भेसळ करण्यात येत असते. गुळाला स्वतःची अशी वेगळी चव असते. जर तुम्हाला गूळ खाल्ल्यानंतर तो अतिगोड किंवा त्याच्या चवीत, टेक्श्चरमध्ये काही वेगळेपणा जाणवत असल्यास तो गूळ शुद्ध असण्याची शक्यता कमी असते.

हेही वाचा : तुम्हीही चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून पित आहात? मग पाहा, हे गुळाच्या चहाचे पाच आरोग्यदायी फायदे…

२. स्टार्च

गुळाचा लहानसा खडा थोड्याशा पाण्यात विरघळवून पाहा. खडा विरघळल्यानंतर गुळाचे कण जर पाण्यात राहिलेले असतील, तर त्या गुळामध्ये स्टार्चचा वापर केला असण्याची शक्यता असते. अनेकदा भेसळ करताना स्टार्चचा वापर केला जातो.

३. खनिज तेल

गूळ तयार करताना, त्यामध्ये खनिज तेल घातल्याने गुळाला चमक येते आणि तो मऊ होण्यास मदत होते. मात्र, त्याचा परिणाम गुळाच्या गुणवत्तेवर होतो. ही भेसळ ओळखण्याचा अतिशय सोपा उपाय आहे. गुळाचा लहानसा खडा आपल्या दोन बोटांमध्ये घासून पाहा. जर तुमच्या बोटांना तेलकटपणा, ओशटपणा जाणवत असेल, तर त्यामध्ये खनिज तेलाचा वापर केला गेलाय, असे तुम्ही समजू शकता.

४. कृत्रिम किंवा खाण्याचा रंग

गूळ सोनेरी, चॉकलेटी रंगात येत असतो. मात्र, त्याचा अगदी मूळ रंग हा गडद असतो. जर तुम्हाला तुमच्या घरी असणारा गूळ खूपच पिवळा दिसत असेल, तर त्यामध्ये कृत्रिम किंवा खायचा रंग मिसळला असण्याची शक्यता असते.

५. रासायनिक पदार्थांचा वापर

गुळाला मुळातच गोडसर आणि चांगला गंध असतो. मात्र, तुम्हाला गुळाच्या वासात काहीतरी चुकीचे जाणवत असल्यास किंवा त्याच्या वासाने नाकाला त्रास झाल्यास त्यामध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केला असण्याची शक्यता आहे, असे समजावे. गुळाच्या वासावरूनही त्याच्या शुद्धतेची तपासणी करता येऊ शकते.

हेही वाचा : Skin care tips : चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवण्यासाठी ‘स्वस्तात मस्त’ घरगुती उपाय; संत्र्याचा ‘हा’ भाग फेकू नका, असा वापरा….

६. अनावश्यक घटक

शुद्ध गुळामध्ये तुम्हाला अगदी एखादी मुंगी किंवा काही प्रमाणात उसाचे घटक दिसू शकतात. मात्र, त्याव्यतिरिक्त जर काही अनावश्यक गोष्टी अधिक प्रमाणात असतील, तर त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

७. गुळाचा पोत

गुळाला त्याचे एक ठरावीक टेक्श्चर किंवा पोत असते. मात्र, जर घरातील गूळ कोरडा, कडक किंवा फारच मऊ असेल, तर त्यामध्ये खडा मीठ [rock salt] किंवा जिप्सम घालून भेसळ केलेली असू शकते.

Story img Loader