How To Identify Real Kanjeevaram Saree: परंपरागत भारतीय सौंदर्याचा एक आदर्श, कांजीवरम साडी ही उत्कृष्ट कला, समृद्ध वस्त्राचा दर्जा व रंगांमुळे ओळखली जाते. शुद्ध मलबेरी रेशमापासून तयार केल्या जाणार्‍या या साड्या कांचीपुरमच्या भागातील कौशल्यपूर्ण शिल्पकाऱ्यांद्वारे हस्तनिर्मित केल्या जातात. या आकर्षक साड्यांची वाढती मागणी पाहता, फसवणूक करणारे बनावट साड्या तयार करून मोठ्या प्रमाणावर विकतात. खाली दिलेली माहिती तुम्हाला खरी कांजीवरम रेशीम साडी ओळखण्यास मदत करील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरी कांजीवरम साडी कशी ओळखावी?

जरी वर्क

परंपरागत कांजीवरम साड्यांवर सोन्याचे किंवा जरीचे काम असते. जरीची गुणवत्ता चांगली असावी, ती समान रीतीने वितरित केलेली असावी आणि तुटलेले धागे नसावेत किंवा जागा नसावी. जरीचा एक छोटा तुकडा खरंच घासून पाहा. जर ती शुद्ध सोन्याची असेल, तर धागे लाल रंगाचे दिसतील. जर जरी शुद्ध नसेल, तर पांढरे धागे दिसतील.

हेही वाचा… New Year 2025: गर्दीपासून थोडं लांब! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ‘या’ टॉप ५ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

रेशमाची गुणवत्ता

खरे रेशीम हात लावताच मऊ आणि हलके नैसर्गिक चमक असलेले असते. बनावट रेशीम सहसा रफ असते किंवा त्यात ठरावीक चमक नसते. त्याचबरोबर खरे रेशीम एकसारखे, मऊ व गुळगुळीत असते. जर तुम्ही साडीवर बोटे फिरवली, तर ते कापड सपाट आणि एकसारखे वाटले पाहिजे. कांजीवरम रेशीम साडी मऊ असते. बनावट साड्या रफ वाटू शकतात.

तत्परता

जेवढी साडी स्पर्शाने मऊ वाटते, तितकीच खरे कांजीवरम रेशीम मजबूत असते आणि सहज तुटत नाही. साडीची मजबुती तपासणे खूप महत्त्वाचे आहे. कारण- बनावट साड्या स्वस्त असतात आणि त्यात हा टिकाऊपणा नसतो.

रंग फिकट होण्याची चाचणी

खऱ्या कांजीवरम साड्या त्याच्या सुस्पष्ट आणि डिझाइनसाठी प्रसिद्ध आहेत. रंग तेजस्वी आणि चमकदार असावा आणि अनेक वेळा धुतल्यानंतरही तो ब्राईट आणि तसाच असावा. जर रंग फिकट किंवा डल (मलूल) दिसत असेल, तर ती साडी खोटी असू शकते.

हेही वाचा… वॉशिंग मशीनमध्ये ‘हे’ कपडे कधीच धुवू नयेत, तुमची १ चूक पडू शकते महागात!

चमकेची तपासणी

साडी बाहेर घेऊन जा आणि ती सूर्यप्रकाशात कशी चमकते ते पाहा. खरे कांजीवरम रेशीम निसर्गत: प्रकाशात चमकली पाहिजे. जर साडी डल (मलूल) दिसत असेल, तर ती बनावट असू शकते.

अंगठी तपासणी

एक पारंपरिक तपासणी म्हणजे साडीला अंगठीमधून ओढून पाहणे. खरे कांजीवरम रेशीम, जे मलबेरी रेशमापासून बनवले जाते, ते अंगठीमधून सहजपणे जाते. बनावट रेशीम असेल, तर ते अंगठीमधून जाणे कठीण होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to identify real kanjeevaram saree and fake kanjeevaram saree follow these tips dvr