Fresh Strawberries: फळांमध्ये स्ट्रॉबेरी हे एक असे फळ आहे, जे अनेक जण आवडीने खातात. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. परंतु, बाजारातून स्ट्रॉबेरी खरेदी करताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कारण बाजारात अनेकदा खराब किंवा कच्ची स्ट्रॉबेरीदेखील विकली जाते. खालील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही स्ट्रॉबेरी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेऊ शकता.

रंगावरून स्ट्रॉबेरी ओळखा

Sprouted coconuts What they are and if its advisable to have them
अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Belly fats how to burn belly fat using 5 20 30 method know from expert
Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा
Amla Water Benefits
सकाळीच नाही रात्रीदेखील आवळा खाण्याचे अनेक फायदे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
How To Dry Clothes In Winter
How To Dry Clothes In Winter : हिवाळ्यात कपडे ओलसर राहतात? मग वापरून पाहा ‘हे’ तीन हॅक, झटक्यात होईल तुमचं काम
Health Special, children teeth, children health ,
Health Special : लहान मुलांना दात येतात तेव्हा काय खायला द्यावं?
mothers love for fridge
“तुमची आई देखील असंच करते का?” फ्रिज आणि प्रत्येक मराठमोळ्या आईची गोष्ट, Viral Video एकदा बघाच
Diwali diya jugaad diya in cooker video
Kitchen Jugaad Video: महिलांनो दिवाळीत फक्त एकदा कुकरमध्ये पणत्या ठेवा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

तुम्ही ताज्या स्ट्रॉबेरीला त्यांच्या रंगावरूनदेखील ओळखू शकता. ताज्या स्ट्रॉबेरीचा रंग गडद लाल असतो. स्ट्रॉबेरी खरेदी करताना तुम्हाला त्यावर हिरवे किंवा पांढरे डाग दिसले तर त्या खरेदी करू नका. ते कच्चे असू शकते. गोड स्ट्रॉबेरी चमकदार असतात आणि त्यांचा रंग जास्त गडद असतो.

वासानुसार ताजी स्ट्रॉबेरी ओळखा

तुम्ही वासाद्वारे ताजी स्ट्रॉबेरीदेखील ओळखू शकता. ताज्या स्ट्रॉबेरीला गोड वास असतो. जर त्यात कोणत्याही प्रकारचा वास नसेल किंवा कृत्रिम वास येत असेल तर तो खरा नाही हे ओळखा. ताज्या स्ट्रॉबेरी दाबल्यावर किंचित कडक आणि स्पंजसारखी वाटतात. त्याच वेळी दाबल्यावर पाण्यासारखे वाटले तर ते खराब झाले आहे हे ओळखा.

हेही वाचा: थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?

स्ट्रॉबेरी कशी साठवायची?

स्ट्रॉबेरी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. ताज्या स्ट्रॉबेरी लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत ते खरेदी केल्यानंतर लगेच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाहीत.

स्ट्रॉबेरी खाण्याचे काय फायदे?

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. स्ट्रॉबेरीमुळे त्वचा चमकदार होते. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी वजनही नियंत्रित ठेवते, तसेच पचनसंस्थाही सुधारते.

Story img Loader