कोणत्याही नात्यात प्रेम असलं की साहजिकच पझेसिव्हनेससुद्धा आपोआपच येतो. नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या नात्यात तर हा पझेसिव्हनेस खूप जास्त दिसून येतो. एका मर्यादेत पझेसिव्हनेस काहीही वाईट नाही, पण जेव्हा तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह वागतो तेव्हा नात्यात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता असते आणि नातं एका विचित्र वळणावर येतं. त्यामुळे पार्टनरच्या ओव्हर पझेसिव्ह स्वभावाला वेळीच ओळखणं खूप जास्त गरजेचं आहे.
आज आम्ही तुम्हाला तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह आहे का आणि हे कसं ओळखायचं, याविषयी सांगणार आहोत. खालील काही लक्षणांवरून हे तुम्ही सहज ओळखू शकता.
वेड्यासारखा विचार करणं
जर तुमचा पार्टनर वेड्यासारखा तुमच्याबद्दल सतत खूप विचार करत असेल तर हे पझेसिव्हनेसचं खूप मोठं लक्षण आहे. पार्टनर जर आपल्या आई-वडिलांसोबत असेल किंवा मित्रमंडळींसोबत असेल, तरीसुद्धा तुमच्याबद्दलच वेड्यासारखा विचार करत असेल किंवा तुम्हाला सतत कॉल किंवा मेसेज करत असेल तर हे पझेसिव्हनेसचं लक्षण आहे, हे समजून घ्यावं.
सतत मेसेज किंवा कॉल करणं
जर तुमचा पार्टनर तुम्हाला दिवसभर सतत कॉल किंवा मेसेज करत असेल आणि तु्म्ही कुठे आहात, काय करत आहात, याची चौकशी करत असेल तर कदाचित तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह आहे.
जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवण्याचा अट्टहास
जर तुमचा पार्टनर तुम्हाला स्पेस देत नसेल आणि जास्तीत जास्त मोकळा वेळ त्याच्यासोबत घालवण्याचा अट्टहास करत असेल, तर तुमचा पार्टनर ओव्हर पझेसिव्ह वागतोय.
मोबाइल चेक करणं
नात्यात प्रेमासोबत विश्वास हा खूप महत्त्वाचा घटक असतो, पण ओव्हर पझेसिव्हच्या नादात जर तुमचा पार्टनर तुमच्यावर संशय घेत असेल तर हे तुमच्या नात्यासाठी चांगलं नाही. अनेक ओव्हर पझेसिव्ह प्रकरणांत पार्टनर एकमेकांचे फोन चेक करतात, जे खूप चुकीचं आहे.
हक्क गाजवणं
ओव्हर पझेसिव्ह असलेला पार्टनर तुमच्यावर हळूहळू हक्क गाजवायला लागतो. आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागावं, असं त्यांना वाटतं ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील वैयक्तिक स्पेस गमावतो.
(टीप: वरील लेख सामान्य निरीक्षणावर आधारीत आहे)