आपलीदेखील एखादी गर्लफ्रेण्ड असावी, असे बऱ्याच मुलांना वाटते. परंतु मुलीशी संवाद साधण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच त्यांचे अवघडलेपण समोर येते. अनेक मुलांमध्ये ही भीती पाहायला मिळते. मुलीशी संवाद साधण्याची खुबी कशी साधावी, हा विचार त्यांच्या मनात घोळत असतो. इथे देण्यात आलेल्या काही टीप्स आत्मसात केल्यास मुलींशी उत्तम ‘संवाद कौशल्य’ आत्मसात करण्यास मदत होऊन संवादाचे पहिले पाऊल टाकणे सोपे होईल.
एखादे काम अथवा प्रश्नाने संवादास सुरुवात करावी – कोणत्याही मुलीशी संवादाची सुरुवात हाय-हॅलोने करावी. स्मितहास्य करून हॅलो म्हणत आपले नाव सांगत, तिच्यादेखील नावाची विचारणा करावी. अशाप्रकारे थेट संपर्क साधताना तुम्हाला अवघडल्यासारखे होत असल्यास एखादे काम अथवा प्रश्नाने संवादाला सुरुवात करावी.
कॉमन फ्रेण्ड – एखाद्या कॉमन फ्रेण्डच्या माध्यमातून संपर्क साधून संवाद साधू शकता अथवा कॉमन फ्रेण्डचा विषय काढून बोलण्यास सुरुवात करून संवादाचे पहिले पाऊल उचलावे. कॉमन फ्रेण्ड नसेल पण थेडी ओळख असल्यास आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी अथवा परिसरातील मोहक वातावरणाबाबतचा संवाद छेडावा.
स्तुती करा – एखाद्या मुलीची स्तुत करणेदेखील तुमचा त्या मुलीसोबतचा संवाद पुढे नेण्यास मदत करू शकते. परंतु, खोटी स्तुती करू नका. काम करण्याची तिची पद्धत, तिचे वागणे, इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन तिची स्तुती करू शकता. या व्यतिरिक्त तिने वापरलेला परफ्यूम अथवा तिच्या हेअर स्टाईलचे कौतुक करू शकता. परंतु हे करताना त्या अनोळखी मुलीसोबत चुकूनसुद्ध असे वागू नका की तिला अवघडल्यासारखे होईल.
कॉमन हॉबी – संवादाची सुरुवात करण्यासाठी दोघांमधील कॉमन हॉबी शोधून काढा. जसे दोघांकडील पुस्तकांचे कलेक्शन, परफ्यूम अथवा बॉडी स्प्रे इत्यादी कॉमन आवडींवरून तुम्ही संवादाची सुरुवात करू शकता.
कामाच्या बहाण्याने – कामाच्या बाहाण्याने तुम्ही अनोळख्या मुलीसोबतच्या संवादाची सुरुवात करू शकता जर ती तुमच्या कॉलेजमध्ये असेल, तर नोट्स घेण्याच्या बाहाण्याने अथवा ऑफीसमधली असेल, तर तुमच्या पीसीमध्ये झालेल्या एखाद्या गडबडीच्या बाहाण्याने तुम्ही तिच्याशी संपर्क साधून संवादाचा श्रीगणेशा करू शकता.