बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वात जास्त दुर्लक्ष आरोग्याकडे होते. रोजचा कामाचा ताण, प्रवासाची दगदग यांमध्ये शरीराची काळजी घेण्याचा पुरेसा वेळ मिळत नाही. याचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, पिंपल्स, डार्क सर्कल्स अशा समस्या उद्भवतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरले जातात, काही महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण यानेही काहीवेळा फरक दिसून येत नाही. उलट सेन्सिटिव्ह त्वचा असणाऱ्यांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. यासाठी काही नैसर्गिक उपाय करता येतील.
आपण नेहमी तरुण दिसावे आणि आपली त्वचा चमकदार व्हावी असे प्रत्येकालाच वाटते. असे होण्यासाठी त्वचा निरोगी असणे आवश्यक असणे गरजेचे असते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही पदार्थ मदत करतात, कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.
त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी या पदार्थांचा करा रोजच्या आहारात समावेश
- कॅरोटीन आणि कॅरोटीनॉइड्स पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यात आढळणाऱ्या फायटोकेमिकल्समुळे युवी किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. संत्री, गाजर अशा कॅरोटीन असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.
- ‘विटामिन सी’ त्वचा अधिक मऊ करण्यासाठी प्रभावशाली अँटिऑक्सिडंट मानले जाते. त्यामुळे ‘विटामिन सी’ असणाऱ्या पदार्थांचा म्हणजेच द्राक्ष, लिंबू यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.
- ब्रोकली, कोबी, फ्लॉवर यांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट आढळतात. या पदार्थांच्या सेवनाने चेहऱ्यावरील पिंपल्स पासून सुटका मिळवण्यास मदत मिळते.
- क्वेर्सटीनं फ्लॅवोनॉइड त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. क्वेर्सटीनं फ्लॅवोनॉइड प्रामुख्याने सफरचंद, कांदा, चहा आणि रेड वाईनमध्ये आढळते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)