6 Ways to Improve Hearing Naturally : बदलत्या जीवनशैलीचा शरीरातील इतर भागांवर जसा परिणाम होतो तसा कान आणि डोळ्यांवरही होत असतो. कानात सतत ब्लूटूथ, इयरफोन लावून गाणी ऐकणं, जोरात ओरडून बोलणे यामुळे कानाच्या समस्या वाढत आहेत. अनेकांना एका कानाने किंवा दोन्ही कानाने अंशत: किंवा पूर्णपणे ऐकू येत नाही. हळूहळू ही समस्या वाढते. अनेक कारणांमुळे तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. जर तुम्हालाही कानाने कमी ऐकू येत असेल आणि यावर तुम्ही काही उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची ऐकण्याची क्षमता सुधारू शकता.
ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपाय
१) मोठ्या आवाजापासून दूर राहा
जेव्हा तुम्हाला सतत मोठ्या आवाज असलेल्या वातावरणात राहावे लागते, तेव्हा तुमच्या ऐकण्याची क्षमता कमी होते. अशावेळी शक्य असल्यास मोठ्या आवाजापासून दूर राहा आणि इअरप्लग वापरा. तसेच कामाच्या ठिकाणी मोठ्या आवाजाच्या मशीन्स असतील तर तशा वातावरणातून काही वेळ बाहेर या आणि कानांना थोडा आराम द्या.
२) धूम्रपान टाळा
धूम्रपान करण्याची सवय सोडा, कारण ऐकण्याची क्षमता कमी होण्यामागे हे देखील एक कारण आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, धूम्रपान केल्याने श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका दुपटीने वाढू शकतो. याचे कारण असे की, रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन तुमच्या कानातील पेशी निरोगी राखण्यासाठी आवश्यक असते. परंतु, सिगारेटमधील निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साइडमुळे त्याला धोका निर्माण होतो. धूम्रपानामुळे तुमच्या कानाच्या आवरणालाही त्रास होतो.
३) औषधांच्या सेवनाबाबत सावधगिरी बाळगा
काही प्रिस्क्रिप्शन औषधांचे सेवन तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. यातील काही औषधांचे साइड इफेक्ट्सदेखील असू शकतात, त्यामुळे कोणतीही औषधे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांशी चर्चा करा.
४) कानात मळ जमा होऊ देऊ नका
इअर वॅक्स, ज्याला सेरुमेन असेही म्हणतात, ही एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे, जी तुमच्या कानाच्या आतील भागाचे कण, बॅक्टेरिया आणि संसर्गापासून संरक्षण करते. कानातील मळ तुमच्या बाहेरील कानात असलेल्या ग्रंथींद्वारे स्रावित होते. जी जास्त प्रमाणात जमा झाल्यासही तुम्हाला ऐकू येण्यास समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे वेळोवेळी कान स्वच्छ करा.
५) कापसाचे बोळे किंवा इतर कोणत्याही गोष्ट वापरू नका
कानात सतत कापसाचा बोळे किंवा इतर कोणतीही गोष्ट कधीही ठेवू नका. असे केल्याने तुमच्या कानाचा पडदा खराब होण्याचा धोका असतो, ज्यामुळे वेदना होतात आणि ऐकण्याची क्षमता कमी होते.
६) पूरक आहार आणि जीवनसत्त्वांचे सेवन करा
जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि तणावाची पातळी कमी करणे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. या सर्व गोष्टी तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम करू शकतात.