अँड्रॉईड मोबाईलच्या इंटरनेटला स्पीड मिळत नाही म्हणून अनेकांची चिडचिड होते. ऐन कामाच्या वेळी इंटरनेटचा स्पीड कमी झाल्यास काय करावे ते सुचत नाही. अगदी ३ जी किंवा ४ जी इंटरनेट असेल तरीही योग्य तो स्पीड न मिळाल्याने आपण वैतागतो. मात्र काही सोपे उपाय केल्यास या समस्येपासून नक्कीच सुटका होऊ शकते. काय आहेत इंटरनेट स्पीड मिळविण्याच्या खास टिप्स पाहूया…

१. अनावश्यक अॅप करा अनइन्स्टॉल – अनेकदा आपण त्यावेळेस आवश्यक असणारी अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करतो. मात्र नंतर ती अॅप्स अजिबात वापरत नाही. पण ज्या अॅप्सची तुम्हाला गरज नाही ती अॅप्स वेळच्या वेळी डिलिट करत राहा. मोबाईलमध्ये जास्त अॅप्स असतील तर त्याचा इंटरनेटच्या स्पीडवर परिणाम होतो.

Funny Video : Funny names of chakli
बाई… हा काय चकलीचा प्रकार! दचकलीपासून बिचकलीपर्यंत चकलीचे ८ प्रकार चर्चेत, मजेशीर VIDEO एकदा पाहाच
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
AI chatbots like ChatGPT and Perplexity can also be used as search engines
Chromeवर Google Searchऐवजी ChatGPT आणि Perplexity AI कसे बदलावे? जाणून घ्या सोपी पद्धत
Delhi: Elderly Man Robbed At Knife Point By Bike-Borne Thieves On Pretext Of Asking Directions In Vivek Vihar
चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; वृद्ध व्यक्तीबरोबर भर दिवसा काय घडलं पाहा; VIDEO पाहून गोंधळून जाल
Nikki Tamboli And Pratik Sahajpal
प्रतीक सहजपालबरोबरच्या नात्यावर निक्की तांबोळीचे स्पष्टीकरण; म्हणाली, “तुमची जितकी मैत्री…”
How To Avoid Scams During Diwali
How To Avoid Scams : डिजिटल फ्रॉडपासून सावध राहा; नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचा सल्ला वाचा
Pune's Favourite Bappa Long Queues at Shrimant Dagdusheth Temple in Pune Viral Video
पुणेकरांचा लाडका बाप्पा! श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची भली मोठी रांग, Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Navi Mumbai Polices Cyber Squad uncovered major online fraud gang during a Rs 10 lakh investigation
बनावट कागदपत्रांव्दारे बॅंकखाते बनविणारी टोळी गजाआड, नवी मुंबईच्या सायबर पथकाची कारवाई 

२. प्रिफर नेटवर्क सेट करा – तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किती स्पीडचे इंटरनेट वापरायचे आहे हे तुम्ही ठरवू शकता. त्यानुसार तुमचा फोन ४ जी पर्यंत सपोर्ट करत असेल तर जास्तीत जास्त स्पीडचे इंटरनेट वापरल्यास तुमचे सर्फींग सोपे होईल. त्यामुळे सेटींग्जमध्ये जाऊन ३ जी आणि ४ जी नेटवर्कचा पर्याय निवडा आणि तो वापरा.

३. फास्ट ब्राऊजर – प्ले स्टोअरमध्ये असे काही ब्राऊजर असतात ज्यामुळे तुम्ही इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता. यामध्ये ऑपेरा मिनी, यूसी ब्राऊजर, क्रोम यांचा समावेश आहे. याशिवाय कोणतंही अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी ते कोणत्या ब्राऊजरमधून होतंय याकडे आवर्जून लक्ष द्या.

४. ब्राऊजर मोडमध्ये टेक्स मोड निवडा – ब्राऊजरमध्ये सर्फींग करताना तुम्हाला केवळ टेक्स्ट सर्च करायचा असेल आणि इमेजेसची गरज नसेल तर अॅपच्या सेटींग्जमध्ये जाऊन टेक्स मोड निवडा. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढण्यास मदत होईल.

५. कॅशे क्लिअर करा – इंटरनेट स्पीड कमी मिळत असेल, तर कॅशे मेमरी क्लिअर करा. ज्याप्रमाणे आपण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची कॅशे मेमरी क्लिअर करतो त्याचप्रमाणे मोबाईलचीही कॅशे क्लिअर करणे आवश्यक असते. कॅशे मेमरी जास्त झाली की इंटरनेटचा वेग मंदावतो, त्यामुळे वेळच्या वेळी कॅशे क्लिअर करत राहा