एक चमचा बटर/ लोणी (Butter) तुमच्या साध्या पदार्थाची देखील चव वाढवू शकते. कित्येक पदार्थ बटरशिवाय अपूर्ण आहेत. पण बटरची चव तोपर्यंतच चांगली असते जोपर्यंत ते ताजे असते. तुम्ही पाहिले असेल की, बटर/ लोणी फ्रिजमधून बाहेर ठेवल्यास त्याची चव बिघडते आणि त्याचा रंगही बदलतो. त्यामुळे जास्त दिवस बटर/ लोणी ताजे राहण्यासाठी ते योग्य पद्धतीने साठवणे आवश्यक असते. चला जाणून घेऊ यासंबधित काही टिप्स
बटर/ लोणी जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी टीप्स
१. बटर/ लोणी फ्रिजमध्ये ठेवणे हा सर्वात सोपा आणि सामान्य उपाय आहे. पण कित्येक लोक हे देखील करत नाही. जे लोक एवढी साधी गोष्ट पाळत नाही त्यांच्या निष्काळजीपणामुळे बटर/ लोणी खराब होऊन जाते. जर तुम्ही बटर/ लोणी बाहेर तसेच सोडले तर ते ऑक्सिडाइज्ड होते आणित त्याची चव, रंग सर्व काही बदलून जाते. कमी तापमानात ते ठेवल्यास ऑक्सिडायझेशनची शक्यता कमी होते आणि बटरची शेल्फ लाईफ वाढते.
२. खोलीच्या तापमानावर साठवलेले ताज्या पांढऱ्या लोणीपेक्षा मीठ असलेले लोणी खराब होण्यास जास्त वेळ लागतो. पण तुम्ही तुमच्या किचन स्लॅबवर लोणी साठवत असलात तरी बॅक्टेरियाची वाढ टाळण्यासाठी ते सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
हेही वाचा – Kitchen Tips: लिंबू साठण्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरा, जास्त दिवस राहू शकतात ताजे आणि रसाळ
३. ॲल्युमिनियम फॉइल वापरणे टाळा. जर तुम्ही असा विचार करत असाल की बटरसाठी ॲल्युमिनियम फॉइल वापरणे चांगली कल्पना असू शकते, तसे नाही. ॲल्युमिनियम फॉइल ऑक्सिडेशन गती वाढवते, ज्यामुळे तुमचे लोणी खराब होऊ शकते.
४. बटर किंवा लोणी साठवण्यासाठी तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे हवाबंद डबे मिळतील. हे बटरचे उष्णता, सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजनपासून किंवा जीवाणूंच्या वाढीस उत्तेजन देणार्या घटकांपासून संरक्षण करते.
हेही वाचा – स्वयंपाकघरातील डब्बे तेलकट झाले आहेत का? मग चहा पावडर वापरून साफ करा
५. बटरसोबत आलेला बटर पेपर फेकून न देण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या बटरची चव टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच बटर प्लेटमध्ये ठेवण्यापेक्षा बटर पेपर वापरणे चांगले आहे.