Tips To Follow During fast: जेव्हा एखादी व्यक्ती उपवासात काहीही खात नाही तेव्हा त्याच्या शरीरातून ऊर्जा नाहीशी होते. आयुर्वेदात उपवास करताना शरीराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते. अशावेळी शरीर कमकुवत होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला जातो. जेव्हा उपवासाच्या वेळी आहारात बदल होतो, तेव्हा झोप आणि आळशपणा जाणवणे सामान्य आहे. मानवी शरीर हे नैसर्गिकरित्या स्वतःची काळजी घेण्यास सक्षम असते. पण आयुर्वेदानुसार उपवासाचे योग्य पालन करणेही आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुर्वेदात उपवासाचे सांगितलेले फायदे

श्री श्री तत्व पंचकर्म डॉट कॉम नुसार, आयुर्वेदात उपवास आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. उपवासामुळे लोकांची पचनक्रिया सुरळित राहते. शरीरासोबत मनही स्वच्छ आणि शांत राहते. शरीरातून विषारी घटक काढून टाकले जातात. मेंदूची काम करण्याची क्षमता वाढते. त्वचेची चमक वाढते आणि केसांसाठीही फायदेशीर असते. यामुळे रोगप्रतिकारशक्तीही चांगली राहते.

( हे ही वाचा: शुगर २००-४०० mg/dl असल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; जाणून घ्या या पातळीवर Sugar कशी नियंत्रित करावी)

उपवास करताना या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा

  • उपवासाच्या वेळी जेव्हाही भूक लागते तेव्हा खा.
  • लिंबू, आले, वेलची, पुदिना, बडीशेप यांसारख्या गोष्टींचे सेवन करावे.
  • वेळोवेळी गरम पाणी प्या, त्यामुळे शरीरात हायड्रेशन टिकून राहते.
  • उपवासाच्या शेवटी, आहारात फक्त ज्यूस किंवा हलके अन्न समाविष्ट करा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to keep fasting according to ayurveda know easy tips gps