How to keep house cold without AC: या कडक उन्हात, घराबाहेर तर सोडा घरातसुद्धा राहता येत नाही. विशेषतः जेव्हा वीज जाते किंवा कूलर किंवा पंखा अचानक बिघडतो. तेव्हा अगदी काही सेकंदांतच व्यक्ती घामाने भिजते. आजकाल अनेक घरांमध्ये एसीची सुविधा उपलब्ध आहे; परंतु ज्यांच्या घरात एसी किंवा कूलर नाही ते उन्हाळ्याचे दिवस कसे घालवतात याबाबत विचार करा. सर्वांनाच एसी किंवा कूलर घेणं परवडत नाही. अशा परिस्थितीत एअर कंडिशनरशिवाय घरातील सर्व खोल्या थंड कशा ठेवाव्यात, हे आज आपण जाणून घेणार आहोत. काही पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचे घर थंड ठेवू शकता.
उन्हाळ्यात एसीशिवाय घर कसे थंड ठेवावे?
जर तुमच्या घरात एसीची सुविधा नसेल, तर बाथरूम आणि स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा. त्यामुळे उष्णता आणि आर्द्रता कमी होईल, ज्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. एक्झॉस्ट फॅन उन्हाळ्यात घराला सहज थंड करू शकतात आणि त्यामुळे जास्त उष्णता जाणवत नाही. विशेषतः दुपारी एक्झॉस्ट फॅन चालू केल्याने घरातून गरम हवा बाहेर पडते.
थंड हवा वाहण्यासाठी खिडकीसमोर टेबल फॅन ठेवा. अतिरिक्त थंड हवा मिळविण्यासाठी तुम्ही एका वाटीत बर्फ ठेवून, तो खिडकीसमोर असलेल्या पंख्यासमोर ठेवू शकता.
दिवसा तुमच्या घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. घराच्या आत हलक्या रंगाचे पडदे लावा. सुती कापडाचे पडदे वापरा. त्यामुळे घरात सूर्यप्रकाश येण्यापासून रोखला जाईल. त्याशिवाय इन्सुलेटेड काचेच्या खिडक्या खोलीचे तापमान वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात.
दिवसा स्वयंपाक करण्याऐवजी स्वयंपाकघरातील सर्व कामे सकाळी १०-११ पर्यंत पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला दुपारी स्वयंपाकघरात काम करण्यापासूनही विश्रांती मिळेल. तसेच, ओव्हन, ग्रिलिंग मशीन किंवा उष्णता निर्माण करणारे स्वयंपाकघरातील कोणतेही उपकरण जास्त काळ चालवू नका. थंडावा देणारे पदार्थ खा. हंगामी फळे आणि भाज्या खा. टोस्टर, मायक्रोवेव्ह व ड्रायर यांसारख्या उष्णता निर्माण करणाऱ्या लहान उपकरणांचा वापर टाळा.
घरात सर्वत्र दिवे चालू ठेवू नका. गरज नसल्यास, सर्व बल्ब आणि ट्यूबलाइट बंद ठेवा. त्यामुळे वीज बिल कमी होईल आणि उष्णतादेखील कमी निर्माण होईल. हा छोटासा बदल तुमच्या खोलीच्या तापमानात मोठा फरक करू शकतो.
उन्हाळ्यात तुम्ही तुमचा पलंग थंड ठेवू शकता; जेणेकरून झोपताना तुम्हाला जास्त घाम येणार नाही. कापसाच्या किंवा लिनेनच्या कापडापासून बनवलेल्या बेडशीट्स आणि उशीचे कव्हर वापरा. ही उत्पादने ओलावा सहज शोषून घेतात. जेल-आधारित उशी किंवा कूलिंग मॅटरेस पॅड वापरल्यानेदेखील तुम्हाला आरामदायी झोप मिळू शकते.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी हलक्या रंगाचे कपडे घाला, जे थंडावा देतात आणि उष्णता शोषून घेतात. रेशमी किंवा सॅटिन कापडापासून बनवलेले कपडे घालू नका. थंड वाटण्यासाठी तुमच्या मनगटाच्या आणि मानेवरील नाडीच्या बिंदूंवर बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचे पॅक लावा.
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी अल्कोहोल, चहा, कॉफी इत्यादींचे सेवन कमी करा. नैसर्गिक ज्युस प्या. ताक, नारळ पाणी, पाणी इत्यादी थंडगार पेये प्या. सातू शरबत, शिकंजी, लिंबू पाणी पिणेदेखील चांगले.
तुमच्या घरात अशी भरपूर झाडे लावा, जी घराची उष्णता शोषून घेऊ शकतील. हिरवळ असल्याने तुम्हाला थंडावा मिळतो आणि घरातली हवाही ताजी राहते.