Keep Food Fresh In Fridge: उन्हाळ्यातील तापमानामुळे अन्न खूप लवकर खराब होते. अन्नपदार्थ सतत फ्रीजरमध्ये ठेवता येत नाहीत. या दिवसात ऑफिसला जातानाही गरम तापमानामुळे डब्यातील पदार्थ खराब होतात. अनेकांच्या मनात उन्हाळ्यात अन्न खराब होण्यापासून कसे वाचवायचे असा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.

अन्न खराब होऊ नये यासाठी काय करावे?

उरलेले शिळे अन्न ताज्या जेवणात मिक्स करू नका

अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी शिळे अन्न ताज्या जेवणात मिसळण्याची चूक कधीही करू नका. शिळे अन्न नेहमी ताजे अन्नापासून वेगळे ठेवा, असे केल्याने ते बराच काळ ताजे राहील.

अन्न चांगले झाकून ठेवा

जेवण बनवल्यानंतर ते झाकून ठेवा, कारण उन्हाळ्यात वातावरणात अनेक प्रकारचे जीवाणू वाढतात. अशा परिस्थितीत जर हे अन्नात गेले तर अन्न लवकर खराब होऊ शकते.

बाहेर जाण्यापूर्वी गरम अन्न पॅक करू नका

कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यापूर्वी कधीही गरम अन्न पॅक करू नका. असे केल्याने ते खूप लवकर खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत आधी अन्न थंड होऊ द्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते काही काळ फ्रीजरमध्येदेखील ठेवू शकता, यामुळे त्याचे तापमान कमी होईल; यानंतरच अन्न पॅक करा.