Keep Water Cool In Old Matka Hacks: उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हातून आल्यानंतर माठातलं गार पाणी मिळालं तर त्यासारखं दुसरं सुखं काही नाही. एव्हाना प्रत्येकाच्या घरात नवा माठ किंवा जुना माठ पुन्हा वापरण्यास सुरुवात झाली असणार. पण नवीन माठात पाणी थंड होते आणि त्या पाण्याला जसा मातीचा गंध असतो. पण जुन्या माठात पाणी तुलनेने तितकं थंड होत नाही आणि त्या पाण्याला मातीचा गंधही येत नाही. जर तुम्ही असा विचार करत असला तर तुम्हाला हे ऐकून नवलं वाटू शकते की, तुमचा जुन्या माठाच्या मदतीने तुम्ही फ्रिज सारखे थंड पाणी पिऊ शकता. उन्हाळ्यात सर्वांना गार पाणी प्यायचे असते पण आरोग्यासाठी फ्रिजचे पाणी चांगले नसते. अशा परिस्थितीत माठातील थंड पाणी तुम्हाला ताजेतवाने ठेवण्याचे काम करु शकते. जुन्या माठाच्या मदतीने तुम्ही फ्रिजसारखे पाणी थंड कसे ठेवू शकता जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माठ घासून घ्या – खरं तर माठाला खूप छोटे छोटे छिद्र असतात ज्यातून हवा खेळती राहते आणि पाणी थंड राहते. पण माठ जुना झाल्यानंतर त्यामध्ये धूळ साचते आणि छिद्र बंद होतात. ज्यामध्ये पाणी थंड होऊ शकत नाही. अशावेळी जर तुम्ही माठ व्यवस्थित घासला तर छिद् मोकळे होतात आणि पुन्हा थंड होऊ शकते.

हेही वाचा – ”फ्रिजपेक्षा माठच चांगला!” म्हणत आनंद महिंद्रानी सांगितले फायदे, तुमच्याकडे माठ आहे का विचारताच म्हणाले…

योग्य जागी ठेवा पाठ – माठ अशा जागी असला पाहिजे जिथे थेट ऊन येत नाही. जर तुम्ही माठ थंडी ठिकाणी ठेवला तर तिथे पाणी गरम होत नाही. तुम्ही माठ खोलीमध्ये किंवा मोकळ्या जागी ठेवायची असेल तर झाडाखाली किंवा सावलीत ठेवणे योग्य होईल. जिथे माठ ठेवाल तिथे हवा खेळती असली पाहिजे, याकडे लक्ष द्या.

माठाला ओल्या टॉवेल गुंडाळा – जर उन्हाळ्यात माठ वारंवार कोरडा पडत असेल तर योग्य असेल की तुम्ही जाड टॉवेल घ्या आणि ते ओला करून माठाला चहूबाजुंनी व्यवस्थित गुंडाळा. माठाचा खालाच्या गोल भागावरच टॉवेल गुंडाळायचा आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही साधा कपडा माठाला गुंडाळला तर तो वारंवार ओला करावे लागेल.

हेही वाचा – तांब्याची बाटली की मातीचा माठ: कोणत्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक?

वाळूवर ठेवा- भांडे स्टँडवर ठेवत असल्यास तो थाली वाळू ठेवणे चांगले होईल. माठातील पाणी वाळूच्या संपर्कात राहून थंड राहील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to keep water cool in old math or earthen pot as fridge in summer follow these cleaning maintaining tips and hacks snk
Show comments