How To Clean A Toilet : घर स्वच्छ आणि चमकदार दिसण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. घरातील इतर वस्तू आपण महिन्यातून एकदा साफ करू शकतो. पण, बाथरूम, टॉयलेट दरररोज स्वच्छ करणे गरजेचे असते. कारण- दिवसभर या दोन्ही जागा कित्येकदा वापरल्या जातात. सकाळी झोपेतून उठल्यावर, तसेच अधूनमधूनही याचा वापर केला जात असतो. पण, टॉयलेट दररोज साफ करणे आपल्यापैकी कोणालाच शक्य होत नाही. त्यामुळे टॉयलेटवर पिवळे डाग पडणे, टॉयलेटमधून दुर्गंधी येणे यांसारख्या तक्रारी बहुतेकांच्या घरांत ऐकू येतात. अशा वेळी अचानक घरी कोण पाहुणे आले, तर गृहिणींची तारांबळ उडते. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत; ज्यामुळे तुमच्या टॉयलेटमधील दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल (How To Clean A Toilet).

मास्क आणि लिंबाचा उपयोग करून केलेली ही ट्रिक एकदा वापरल्याने आठवडाभर साफसफाईची गरज भासणार नाही आणि फ्लश केल्यावर फक्त टॉयलेटच स्वच्छ होणार नाही, तर तेथील दुर्गंधीदेखील दूर होईल. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करण्याची गरज नाही. तर तुम्हाला ही ट्रिक करण्यासाठी काय साहित्य लागेल ते पाहू?

१. लिंबू
२. सर्जिकल मास्क
३. कैची

मास्कमध्ये लिंबू घालण्याची ट्रिक (How To Clean A Toilet)

टॉयलेट (कमोड ) दुर्गंधीपासून दूर ठेवण्यासाठी लिंबू आणि मास्कची ट्रिक वापरण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लिंबूचे छोटे छोटे तुकडे करा.
नंतर मास्कचा वरचा भाग पट्ट्यांसह कापा; जेणेकरून त्यात तुम्हाला लिंबूचे तुकडे ठेवण्यासाठी जागा मिळेल.
लिंबूचे तुकडे टाकल्यानंतर त्यांना कापून घेतलेल्या पट्ट्यांनी (मास्कच्या कापून घेतलेल्या उर्वरित पट्ट्या) बांधून घ्या.

हेही वाचा…Papaya Health Benefits : पपई गरम असते की थंड? हिवाळ्यात खाल्ल्याने ‘या’ तीन समस्यांवर ठरू शकतो रामबाण उपाय

व्हिडीओ नक्की बघा…

ही ट्रिक कशी काम करेल (How To Clean A Toilet)

मास्कमध्ये लिंबाचे तुकडे टाकून तो बांधला की, तो पॅकेटसारखा किंवा बटव्यासारखा दिसेल. आता तुम्हाला हे पॅकेट पट्ट्यांच्या मदतीने फ्लश टाकीच्या आतमध्ये लटकून ठेवावे लागेल. हे पॅकेट फ्लश टँकच्या पाण्यात लिंबू आम्ल मिसळण्यास मदत करेल. जेव्हाही तुम्ही फ्लश कराल तेव्हा लिंबाच्या आम्लाने टॉयलेट स्वच्छ होईल.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ट्रिकचा व्हिडीओ @easyhometip आणि @home2tips या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Story img Loader