How to Knot a Tie : टाय ही फॉर्मल पोशाख आणखी आकर्षिक दिसायला मदत करणारी गोष्ट आहे. अनेक लोकांना टाय बांधायला आवडतं पण काही लोकांना टाय बांधता येत नसल्यामुळे इच्छा असूनही मनासारखा लूक करता येत नाही. टाय बांधताना तुमचाही गोंधळ होतो का? टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला हटके ट्रिक सांगणार आहोत.या ट्रिकच्या मदतीने तुम्ही अगदी काही सेकंदात टाय बांधू शकता.
लग्न, लहान-मोठे समारंभ, मुलाखत किंवा अन्य कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम टाय मुळे एक वेगळा लूक येतो. सोशल मीडियावर टाय बांधण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अगदी १० सेकंदात टाय कसा बांधायचा दाखवले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हातात टाय आहे. टायचा शेवटचा भाग तीन वेळा हाताला गुंडाळला. त्यानंतर हाताला गुंडाळलेली टायचा दुसरा पट्टा हा पहिल्या पट्ट्याच्या वरुन काढलाय आणि क्षणार्धात टाय कसा बांधतात, हे दाखवले आहे. व्हिडीओ पाहताच तुम्हाला लगेच लक्षात येईल.
हेही वाचा : पुरुषांनो, फक्त दहा मिनिटांमध्ये नेसा परफेक्ट धोतर, दिवाळीला करा असा पारंपारिक लूक, पाहा व्हिडीओ
mwnstyle या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काही सेकंदात टाय कसा बांधायचा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद.खूप सोपी पद्धत सांगितली” अनेक युजर्सनी आभार व्यक्त केले आहेत.