Home Remedies For Dark Underarms साधारणपणे अंडरआर्म्सचा रंग आपल्या बाकीच्या त्वचेच्या रंगाशी जुळतो. पण कधी कधी आपल्या अंडरआर्म्सची त्वचा काळी पडू लगाते. गडद अंडरआर्म्स हे कोणत्याही गंभीर आजाराचे संकेत देत नसले तरी त्यांच्यामुळे विशेषत: ज्या महिलांना स्लीव्हलेस कपडे घालणे आवडते त्यांना ते घालायला मिळत नाही. बाहेर वावरताना कुणी पाहिलं तर लाज वाटते. वॅक्सिंग, बॉडी स्प्रे, हेअर रिमूव्हल क्रीमचा अति वापर, भरपूर घाम येणे, शरीरातील हार्मोनल बदल इत्यादी कारणांमुळे काखेतील काळेपणा खूपच वाढतो. तेव्हा अशा अंडरआर्म्सना स्वच्छ करून त्यांचा काळेपणा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोरफड

एलोवेरा म्हणजेच कोरफड आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने ते त्वचेतील जळजळ आणि डेड सेल्स काढून टाकतात. तेव्हा एलोवेरा जेल एक महिना सतत काळ्या अंडरआर्म्सवर लावल्याने काळेपणा दूर होण्यास मदत होते.

बेसन

बेसनाच्या पीठामुळे अंडरआर्म्सचा काळेपणा दूर होतो. यासाठी बेसन, दही आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा आणि अंडरआर्म्सच्या त्वचेवर लावा. ही पेस्ट अर्धा तास तशीच राहू द्यावी , नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.

लिंबाचा रस

अंघोळ करण्यापूर्वी अंडरआर्म्सवर लिंबाची साल चोळावी. अंघोळीनंतर मॉयश्चरायझर लावावे. लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असून त्याच्या वापराने अंडरआर्म्सचा काळसर पणा जाऊन त्वचेचा रंग उजळतो.

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस हा अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. एका बटाट्याचा किस करून त्याचा रस काढून घ्या. आणि या रसाने काखेत मसाज करा. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास अंडरआर्म्समध्ये फरक जाणवतो.

तांदळाचे पीठ आणि मध

अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी त्याजागी तुम्ही तांदळाच्या पीठाने हाताने व्यवस्थित स्क्रब करू शकता. तांदळाच्या पिठात मधही मिक्स करू शकता, स्क्रब करून डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा पुन्हा गोरी होण्यास मदत होईल. मधामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. तांदळाचे पीठ आणि मध यांचे मिश्रण लावून स्क्रब केल्यानंतर थोड्यावेळाने हात स्वच्छ धुवा.

हेही वाचा >> तुम्हीही जेवणात सॉस आणि मसाले अतिरिक्त प्रमाणात वापरता का? तज्ज्ञांनी सांगितला मधुमेहाचा धोका; वाचा सविस्तर…

( डिस्क्लेमर : या लेखात देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)