Belly Fat Loss Yoga Video : दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहे. बैठी जीवनशैलीमुळे वजन वाढ, वाढता पोटाचा इत्यादी आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

पोट कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात पण काहीही फायदा होत नाही. अनेकदा वजन कमी सुद्धा होते पण पोटावरची चरबी कमी होत नाही. तुम्ही सुद्धा या समस्येचा सामना करत आहात का? जर हो तर टेन्शन घेऊ नका, कारण आज आपण पोटाची चरबी कशी कमी करायची, यासाठी खास योगासने जाणून घेणार आहोत. (How to lose belly fat Do these yogas for just 30 seconds)

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
Ragi Satwa Recipe
घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तुमच्या बाळासाठी बनवा नाचणी सत्व; वाचा साहित्य आणि कृती
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video
Papad Chutney Recipe
Papad Chutney : फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा पापडाची चटणी; ८ ते १० दिवस टिकणार, रेसिपी जाणून घेण्यासाठी VIDEO पाहाच

हेही वाचा : Ratan Tata First Job : रतन टाटांना स्वत:च्याच कंपनीत नोकरीसाठी द्यावा लागला होता बायोडाटा; नेमकं घडलं काय होतं? जाणून घ्या रंजक किस्सा

हेल्थ आणि लाइफस्टाइल कोच साक्षी देसाई यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही योगासने सांगतात.

व्हिडीओमध्ये साक्षी देसाई सांगतात, “सगळं करून झालं पण पोटाची चरबी तशीच आहे? मी तुम्हाला मदत करेन. व्हिडीओत दाखवलेले रुटीन फॉलो करा आणि व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.”
त्यानंतर त्या खालील योगासने करून दाखवतात.

  • उष्ट्रासन – ३० सेकंद
  • नौकासन ( Boat Pose): ३० सेकंद
  • नौकासन ( Half Boat Pose) : ३० सेकंद
  • फलकासन : ३० सेकंद
  • भुजंगासन : ३० सेकंद
  • सेतुंबधानस : ३० वेळा
  • अर्ध हलासन : ३० सेकंद

व्हिडीओच्या शेवटी त्या म्हणतात, “आता जर एवढं सारं केले तर थोडे खाण्यावर कंट्रोल करा. नाही तर याचा काहीही उपयोग होणार नाही. धन्यवाद.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

_the_wellness_wave या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज हे योगासने करा आणि योग्य आहार घ्या. ही आसने रोज ३० सेकंदसाठी होल्ड करा आणि ३ ते ४ वेळा करा.

हेही वाचा : Ratan Tata Death: “घड्याळाची टिकटीक थांबली…” हर्ष गोयंका यांची मन हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद. डाएट टीप्स पण सांगत जा” तर एका युजरने लिहिलेय, “अगदी खरे, अतिशय स्तुत्य उपाय! माझा स्वानुभव आहे!” आणखी एका युजरने लिहिलेय, “योगा कठीण आहे पण आरोग्यासाठी उत्तम आहे.”

Story img Loader