Weight Loss : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. चुकीचा आहार, चुकीची जीवनशैली यामुळे वजन वाढीच्या समस्या खूप वाढल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात पण काहीही फायदा होत नाही. काही लोक तर वजन कमी करण्याच्या नादात डाएट करतात आणि आवडीच्या गोष्टी सुद्धा खाणे टाळतात पण आज आपण कोणतेही डाएट न करता काही खास टिप्सच्या मदतीने वजन कमी कसे करायचे, हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात आहारतज्ज्ञ गुंजन मेहता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी डाएट न करता फक्त पाच टिप्सच्या मदतीने वजन कसे कमी करायचे, सांगितले आहे.

आहारतज्ज्ञ गुंजन मेहता यांनी सांगितल्याप्रमाणे –

१. दहा हजार पावले चालण्याऐवजी नियमित ४५ मिनिटे चाला
२. घरी बनवलेले अन्न खा आणि बाहेरचे खाणे टाळा.
३. जेवणाच्या वेळा पाळा आणि वजन कमी करण्याच्या नादात जेवणातील कोणतेही पदार्थ खायला टाळू नका.
४. संतुलित आहार घ्या
५. तुमच्या आहारात प्रोटिन, फायबर, कार्ब्स आणि फॅट्सचे प्रमाण लक्षात घ्या.

हेही वाचा : तुम्हाला वडापाव खायला आवडतो? वडापाव खाल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात? जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात…

गुंजन मेहता यांनी dietitiangunjan या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वजन कमी करणे हा आकडा नाही तर शरीराची काळजी घेऊन जीवनशैलीत बदल घडून आणणे, होय. स्वत:वर लक्ष केंद्रित करा. स्वत:वर प्रेम करा आणि आत्मपरिक्षण करा.”
या व्हिडीओवर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to lose weight without dieting tips for losing weight without diet healthy lifestyle weight loss news ndj
Show comments