Weight loss tips : तुम्हाला तुमचे वजन वाढण्याची चिंता सतावत आहे का? नुसती काळजी करू नका त्याऐवजी यावर उपाय आहे याचा विचार करा. तुम्हाला जर खरोखर वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता तेही जीमला न जाता. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जीमला जाण्याची आवश्यकता नाही. रोजच्या धावपळीत तुम्हाला जीमला जायला वेळ मिळत नसेल तर चिंता करू नका. तुम्हाला काही सोप्या टीप्स सुचवणार आहोत ज्यामुळे तुम्ही शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी आणि वजन करण्यासाठी मदत करतील. पण तुम्हाला हे रुटीन नियमित पाळावे लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीमला न जाता वजन कसे कमी करावे

लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी, आपल्या आहारात फळांचा समावेश करा . याशिवाय शक्यतो पाणी प्या. हे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. तसेच शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ लघवीच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम करते.

हेही वाचा – तुम्हाला बीअरविषयी ‘या’ १० मजेदार गोष्टी माहितीये का? नसेल एका क्लिकवर जाणून घ्या

जर तुम्हाला जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करून लठ्ठपणा कमी करू शकता. सर्व प्रथम, साखरे असलेले पदार्थ खाऊ नका. फॅट्स कमी करण्यासाठी, आपण कोल्ड ड्रिंक पिणे कमी केले पाहिजे.

जास्त तेल असलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. हे तुमच्या शरीरातील फॅट्स लवकर वाढवण्याचे काम करते. तळलेले पदार्थही टाळावेत. त्याचबरोबर, अन्न नेहमी चावून खा. बरेच लोक पटपट अन्न खातात आण बॅड्स फॅट्स वाढवण्याचे काम करतात.

हेही वाचा – प्रेशर कुकरमध्ये ‘हे’ पदार्थ का शिजवू नये? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण

त्याच वेळी, १५ मिनिटे वेळ काढा आणि सकाळी आणि संध्याकाळी धावणे किंवा चाला करा. यामुळे तुमचे शरीराला आकार येईल आणि हाडेही मजबूत होतील.

आतापासून या नियमांचे पालन करा आणि तुमच्या शरीराची काळजी घ्या

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to lose weight without going to the gym snk