ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम करावे लागत असल्यामुळे सध्या अनेकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी पोटाचा वाढता घेर किंवा स्थूलपणा हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. पुरूष आणि महिला दोघांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे बहुतांश लोक यावर काय उपाय करता येईल, याच्या शोधात असतात. पोटाचा घेर कमी करायचा असल्यास योग्य डाएट आणि व्यायाम आवश्यक असतो. रोजच्या धावपळीत या व्यायामालाही वेळ नाही अशी अनेकांची तक्रार असते. घरातही अनेक यांत्रिक उपकरणे आल्याने महिलांचे व्यायामाचे प्रमाण कमी झाले आहे. जीवनशैलीमध्ये काही बदल केल्यास या समस्येपासून आपली निश्चितच सुटका होऊ शकते.

१. आलं पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे आल्याचा आहारात वापर करावा. आलं इतरही समस्यांसाठी उपयुक्त असल्याने त्याचा अपाय होत नाही. मात्र पदार्थामध्ये आलं घालण्याबरोबरच आलं आणि तुळस घातलेला चहा आरोग्याला जास्त चांगला असतो.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
how to clean tea strainer
काळी पडलेली चहाची गाळणी झटपट करा स्वच्छ; वाचा ‘या’ सोप्या टिप्स
Radish leaves benefits reasons why radish leaves must not be thrown away
महिलांनो तुम्हीही मुळ्याची पानं टाकून देता का? थांबा! ‘हे’ ७ फायदे वाचून कळेल किती मोठी चूक करताय
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय

२. जवळपास सर्व भारतीय स्वयंपाकघरात मूगडाळ असते. या डाळीमध्ये ए,बी,सी आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. याशिवाय कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशिअम यासारखी खनिजेही मूग डाळीतून मिळतात. याशिवाय मूग डाळीत प्रथिने आणि फायबरचे प्रमाणही जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मूग डाळीने लवकर पोट भरते त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. याचा वजन आणि विशेषतः पोट कमी होण्यास उपयोग होतो.

३. जेवणानंतर जीरं, ओवा आणि बडिशेप यांची पूड खावी. त्यामुळे अन्नपचन चांगले होऊन वजन कमी करण्यास मदत होते. हे मिश्रण कोमट पाण्यातून घेतल्यास त्याचा जास्त चांगला फायदा होतो.

४. सकाळी उठल्यानंतर काळीमिरी घालून टोमॅटोचा रस प्यायल्यास त्याचाही पोटावरील चरबी घटण्यास उपयोग होतो. मात्र हा रस घेतल्यानंतर काहीच खाऊ नये. याचा निश्चितच फायदा होतो.

५. काकडी सॅलेड म्हणून तर चांगली असतेच पण पोटाचा घेर कमी करण्यासाठी काकडीही उपयुक्त असते. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने अन्नाचे पचन होण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र यासाठी जेवणाच्या आधी काकडी खावी. यामुळे पोट भरलेले राहील्याने जेवण कमी जाते.

६. सूर्यनमस्कार, वक्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन, क्रंचेस यामुळेही पोट कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात विविध गोष्टींचा समावेश करण्याबरोबरच व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे असते.

Story img Loader