ब्लडप्रेशर ही सामान्य आरोग्य समस्या आहे; पण त्यावर उपचार न केल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जीवनशैलीतील बदल, नियमित व्यायाम ही समस्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे कोणत्याही औषधोपचारांशिवाय तुम्ही नैसर्गिकरीत्या ब्लडप्रेशरची समस्या कमी करू शकता. पण, त्यासाठी तुम्हाला खालील काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

१) डॅश फूडचे सेवन करा

हायपरटेन्शनची समस्या थांबविण्यासाठी आहारातून सोडियमचा वापर कमी करताना कडधान्य, फळे, भाज्या व प्रथिनयुक्त आहारावर भर द्या. या संतुलित आहाराने ब्लडप्रेशरची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन

२) मिठाचे सेवन कमी करा

मिठाचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने ब्लडप्रेशरवर गंभीर परिणाम होतो. अशा वेळी प्रक्रिया केलेले आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ खाणे थांबवा. कारण- त्यात अनेकदा सोडियमचे प्रमाण जास्त असते.

३) पोटॅशियमने समृद्ध आहार घ्या

पोटॅशियम जास्त असलेले अन्न- उदा. केळी, रताळे व पालेभाज्या खा. त्यामुळे सोडियमचा प्रभाव कमी होऊ शकतो; तसेच ब्लडप्रेशरची समस्याही कमी होऊ शकते.

४) मॅग्नेशियम आणि कॅल्शियमयुक्त आहाराचा समावेश करा

डॉक्टरांच्या मते, बदाम आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी खनिजे ब्लडप्रेशरची समस्या कमी करण्यास मदत करतात.

५) नियमित व्यायाम करा

नियमित शारीरिक हालचालींमुळे हृदय मजबूत होऊन आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारून ब्लडप्रेशरची समस्या कमी होऊ शकते. दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवा.

६) अॅरोबिक व्यायाम करा

हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगले आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहावे यांसाठी चालणे, जॉगिंग, पोहणे व सायकलिंग यांसारखे अॅरोबिक व्यायामप्रकार करा.

७) शक्ती प्रशिक्षण घ्या

स्नायू मजबूत करण्यासाठी शक्तिशाली व्यायामाचे प्रशिक्षण घ्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरी अधिक कार्यक्षमतेने बर्न होण्यास मदत मिळू शकते.

८) तणाव कमी करा

तीव्र ताण हाय ब्लडप्रेशरसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे योग्य व्यवस्थापनाद्वारे तणावावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी ध्यान, योग किंवा दीर्घ श्वासोच्छवास यांसारख्या रिलॅक्सेशन टेक्निकची मदत घ्या.

९) अल्कोहोलचे मर्यादित सेवन करा

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने ब्लडप्रेशरचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे दारूचे सेवन करीत असाल, तर ती मर्यादित प्रमाणातच घ्या.

१०) वजन नियंत्रणात ठेवा

वाढलेले वजन कमी केल्याने ब्लडप्रेशरचा त्रास कमी होऊ शकतो. निरोगी आहार आणि नियमित व्यायाम यांमुळे वजन नियंत्रणात राहते. परिणामी ब्लडप्रेशरची समस्याही कमी होते.

११) नियमित ब्लडप्रेशरची तपासणी करा

ब्लडप्रेशरचे प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यासाठी नियमितपणे ब्लडप्रेशरची तपासणी करा.

जीवनशैलीतील बदल तुमच्या शरीरावर होणारे परिणाम दर्शविण्यासाठी वेळ घेतात. पण, तुमच्या आहारात किंवा व्यायामाच्या दिनचर्येत महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Story img Loader